बेशिस्त बाईक चालवणाऱ्याचा महिलेने घेतला असा क्लास, प्रत्येकाने हा VIDEO पाहिलाच हवा

 बेशिस्त चालकांना एका महिलेने जबरदस्त चपराक लगावली आहे. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Updated: Jul 13, 2022, 05:52 PM IST
बेशिस्त बाईक चालवणाऱ्याचा महिलेने घेतला असा क्लास, प्रत्येकाने हा VIDEO पाहिलाच हवा title=

Viral Video : रस्त्याने जाताना रोज एक तरी बेशिस्त कार किंवा बाईकस्वार बघितला असेल. या बेशिस्त कारचालक किंवा बाईकस्वारांमुळे अनेक वेळा अपघात झाले आहेत. या बेशिस्त चालकांना कितीही सांगा पण ते काही ऐकत नाही. तरुणाई म्हणजे धगधगतं, सळसळतं रक्त. तरुणाई या जोशातच बेशिस्त गाडी चालवतात. त्यामुळे अनेक वेळा स्वत:सोबत ते इतरांचाही जीव धोक्यात घालतात.

अशा बेशिस्त चालकांना एका महिलेने जबरदस्त चपराक लगावली आहे. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ही महिला जे काही बोलली आहे ते प्रत्येकाने ऐकलं पाहिजे.

''25 सेकंदात होत्याचं नव्हतं होतं''

या महिलेले जे काही सांगितलं आहे ते प्रत्येक बाईकस्वार आणि कारचालकाने ऐकायलाच हवं. खास करुण तरुण पिढीने या गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे. या व्हिडीओमध्ये ही महिला म्हणते की, ''जोरदार स्पीडने बाईक आणि कार चालवणे म्हणजे यात खूप मोठं शौर्य नाही आहे. बेशिस्तपणे ड्रायव्हिंग केल्यामुळे दरवर्षी 1 लाख तरुणांनी आपल्या जीव गमावला आहे.

आई-वडिलांना एका मुलाला वाढविण्यासाठी 25 वर्ष लागतात. मात्र बेशिस्तपणे ड्रायव्हिंग केल्याने 25 सेकंदात तो मृतदेहात बदलून जातो. पोटच्या गोळ्याला लहानाचं मोठं करायचं आणि 25 सेकंदात तो मुलगा डोळ्यासमोरून नाहीसा होतो. काय यातना होत असेल त्या आईला, याचा कधी विचार केला आहे का तुम्ही?''

 

पुढे ती महिला म्हणते, ''तुम्ही काय विचार करता की बेशिस्त ड्रायव्हिंग करुन तुम्ही तुमची ताकद दाखवत आहात. जर तुम्हाला ताकद दाखवायची असेल तर मिल्खा सिंग सारखे तुफान पळा. नीरज चोप्रासारखा जोरदार भाला फेका. जास्त वेगात बाईक आणि कार चालवणे यात कुठलही शौर्य नाही'', अशी चपकार या महिलेने बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांना लगावली.

या महिलने बेशिस्त गाडीचालकांवरही जोरदार ताशेरे ओढले. ती म्हणते, ''जर तुम्ही विचार करता की जास्त वेगात गाडी चालवून तुम्ही खूप हॅडसम आणि डॅशिंग दिसत आहात, तर हे साफ खोटं आहे. तर तुम्ही बेशिस्त दिसता. जेव्हा तुम्ही रस्त्यावर गाडी चालवता तेव्हा हे लक्षात ठेवा तुमचं आयुष्य तुमच्यासोबत तुमच्या आई-वडिलांचं पण आहे''.