भर रस्त्यात तरुणाचे नाटक पाहून तरुणीनं नाही, तर गाडीनंच सोडली साथ...नक्की हे प्रकरण काय? पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये एक तरुण महामार्गावर आपली बाईक चालवत आहे, परंतु...

Updated: Aug 1, 2021, 04:56 PM IST
भर रस्त्यात तरुणाचे नाटक पाहून तरुणीनं नाही, तर गाडीनंच सोडली साथ...नक्की हे प्रकरण काय? पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात कधी काय व्हायरल होईल हे कोणालाही सांगता येणार नाही, सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर लोकं त्यांना जे वाटेल ते शेअर करु शकतात. त्यात काही कंटेन्ट असे असतात जे लोकांचे मनोरंजन करतात, तर काही कंटेन्ट लोकांना माहिती देतात. परंतु काही वेळेला लोकं प्रसिद्धीसाठी आणि फोलोअर्स वाढवण्यासाठी वाटेल ते करत.

असाच एक स्टंटचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आजपर्यंत तुम्ही लोकांना एकापेक्षा एक धोकादायक स्टंट करताना पाहिले असेल. अनेक वेळा असे स्टंट करताना लोकांना त्यांचा जिव देखील गमवावा लागतो. असे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर शेअर केले जातात. ज्या माध्यमातून लोकांसमोर उदाहरण देखील ठेवले जाते, जेणे करुन लोकं असे स्टंट करताना 10 वेळा विचार करतील.

परंतु हा व्हिडीओ थोडा वेगळा आहे, या व्हिडीओमध्ये एक तरुण महामार्गावर आपली बाईक चालवत आहे, परंतु तो बाईकवर बसला नाही, तर उभा आहे. परंतु जेव्हा तो तरुण खाली बसण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या तरुणाचा तोल जातो आणि तो खाली पडतो. त्याचं नशीब इतकं चांगलं असते की, आजुबाजुला कोणतीच गाडी नसते, ज्यामुळे त्या तरुणाला फारस काही लागत नाही. परंतु या तरुणाच्या बाईकचं मात्र फार मोठ नुकसान झालं असणार कारण ती बाईक बिना चालकाची सरळ निघून गेली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ mahichoudhary8570 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. वापरकर्ते या व्हिडीओवर कमेंटकरुन आपले मत व्यक्त करत आहेत. लोकांनी असे स्टंट करणाऱ्या तरुणांना सुचवले आहे की, तरुणांनी अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालू नये. तसेच आजुबाजूच्या लोकांना देखील अशा लोकांपासून लांब रहाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.