Viral Video : भरमंडपात लग्नात नव्या जोडप्यात जेव्हा तिसरा येतो.....

लग्नात फक्त याचीच चर्चा 

Updated: Jul 17, 2021, 11:44 AM IST
Viral Video : भरमंडपात लग्नात नव्या जोडप्यात जेव्हा तिसरा येतो.....  title=

मुंबई : सोशल मीडियावर अनेकदा लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्नसोहळा म्हटलं की, मस्ती, मस्करी आणि उत्साह हा असतोच. असाच एक उत्साहातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्न म्हटलं की फोटोग्राफर हा अत्यंत महत्वाचा भाग असतो. पण जेव्हा हा फोटोग्राफर लग्नात धम्माल करतो आणि तोच कॅमेऱ्यात कैद होतो तेव्हा...

जेव्हा दोघात तिसरा येतो... 

सोशल मीडियावर एक लग्नाची रील्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये Caught in the Act असं म्हटलं तरी या व्हिडीओला वावगं ठरणार नाही. लग्नाचे विधी सुरू असताना फोटोग्राफर फोटो काढत होता. मात्र त्याचा फोटो काढण्याचा अंदाज हा अतिशय चर्चेचा विषय ठरला आहे. 

विधी स्टेजवर सुरू असताना फोटोग्राफर वधु-वराच्या पायाखाली झोपून फोटो क्लिक करत होता. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ तयार करण्यात आला. जो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. जेव्हा दोघात तिसरा येतो... ही म्हण वेगळ्या कारणासाठी वापरली जाते. पण दोघात जेव्हा तिसरा येतो तेव्हा चांगल घडतं. छान फोटो येतात.