Video : गर्भवती महिला मॉलमध्ये सुटकेस ठेवून गेली आणि...पुढे काय झालं पाहून बसेल धक्का

Viral Video : सोशल मीडियावर अनेक धक्कादायक, भयानक आणि अगदी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असे व्हिडिओ पाहिला मिळतात. याशिवाय सोशल मीडियावर जरा हलकेफुलके, हसविणारे व्हिडिओही असतात. लहान मुलाचे, माहितीपूर्ण आणि प्राण्याचे असे अनेक व्हिडिओ आपलं मनोरंजन करत असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून पायाखालची जमीन सरकते. 

Updated: Nov 30, 2022, 03:51 PM IST
Video : गर्भवती महिला मॉलमध्ये सुटकेस ठेवून गेली आणि...पुढे काय झालं पाहून बसेल धक्का title=
Viral Video pregnant woman left her suitcase at the mall with a small child inside Watch what happens next nmp

Trending Video : खरेदीसाठी अनेक जण दुकानात येतात. मोठ्या माणसांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळे...आज सगळीकडे छोटे छोटे मॉल (Mall) आले आहेत. जिथे घरातील लागणारे प्रत्येक गोष्टी आपल्याला मिळतात. घरातील लहानात लहान वस्तू पाहून तांदूळ आणि तेलापर्यंत सगळं. अशा ठिकाणी महिलांची जास्त गर्दी दिसून येते. सोशल मीडियावर अशाच एका मिनी मॉलचा व्हिडिओ (Video) यूजर्सचं लक्ष वेधून घेतं आहे. 

धक्कादायक व्हिडिओ (Shocking video)

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक गर्भवती महिला (pregnant woman) मोठी सुटकेस घेऊन खरेदीसाठी येतं. त्या महिलेकडून ती सुटकेस उचलताही येतं नाही. त्यानंतर ती महिला सुटकेस बाजूला ठेवून काही सामान खरेदी करते. सामान घेतल्यानंतर ती बिल करायला कॉऊंटवर येते..बिलचे पैसे देते आणि कॉऊंटरवरील व्यक्तीला ती सुटकेस दुकानात ठेवण्यासाठी विनंती करते. गर्भवती महिला त्यात ती दिसायलाही चांगल्या घरातील वाटते. माणुसकी म्हणून तो व्यक्ती तिला सुटकेस बाजूला ठेवायची पवानगी देतो. महिलाही पण ती सुटकेस ठेवून निघून जाते...

व्हिडिओ व्हायरल 

दिवसभर दुकानात अनेक ग्राहक खरेदीसाठी येतात. रात्र होते दुकानदार दुकान बंद करुन निघून जातो.  त्याने कधी धानीमनी पण विचार केला नसेल एवढ्या मोठा फटका त्याला आयुष्यात बसला. नेहमी प्रमाणे सकाळी तो दुकान उघडतो आणि त्याचा पायाखालची जमीन सरकते...

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, रात्रीच्या अंधारात अचानक त्या सुटकेसमधून एक लहान मुलगी बाहेर पडते आणि ती गल्ल्यातून पैसे उचलते. त्यानंतर दुकानातील काही वस्तूही ती चोरते आणि सुटकेसमध्ये ठेवते. एवढंच नाही तर ती परत त्या सुटकेसमध्ये जाऊन बसते. 

बघितलं या दुकानदाराला त्याची माणुसकी कशी भोवते. जेव्हा तो दुकानात येतो नेमकं काय घडलं याची त्याला काडीमात्र कल्पना नसते. दुकानातील गल्ल्यातील पैसा आणि वस्तू गायब होते. त्याला काही कळतं नव्हतं नेमकं झालं तरी काय. तो लगेचच पोलिसांना कळवतो. पोलीस ताबडतोब मॉलमध्ये येतात आणि चौकशी सुरु करतात. 

थोड्याच वेळात तिथे सुटकेस घेऊन जाण्यासाठी महिला येते आणि ती शांतपणे आपली सुटकेस घेऊन जातच असते तर पोलीस तिला थांबवतात. ती जरा घाबरते...पोलीस सुटकेस उघडतात आणि मग काय हे सुटकेसमधून एक लहान मुली पैशांसोबत त्यात असते. हे पाहून दुकानदार पण हैराण होऊ जातो. 

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. यूट्यूबवर Social Awareness Video या मालिकेत जनजागृतीसाठी शेअर करण्यात आला आहे.  या व्हिडिओला आतापर्यंत भरपूर लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.