पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या स्कूटीवर चोरांची हात सफाई, गाडीचे नुकसान न करता अशी केली चोरी, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियाचं जग हे असं जग आहे, जेथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतील. यातील काही व्हिडीओ हे आपल्या माहिती पुरवतात, तर काही व्हिडीओ हे आपले मनोरंजन करतात. 

Updated: Nov 28, 2021, 07:24 PM IST
पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या स्कूटीवर चोरांची हात सफाई, गाडीचे नुकसान न करता अशी केली चोरी, पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियाचं जग हे असं जग आहे, जेथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतील. यातील काही व्हिडीओ हे आपल्या माहिती पुरवतात, तर काही व्हिडीओ हे आपले मनोरंजन करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला हसू सुद्धा येईल आणि तुम्हाला माहितीही मिळेल. कारण सोशल मीडियावरती व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका चोरीचा आहे, ज्यामुळे तुम्हाला माहिती मिळेल की, चोर कशा प्रकारे तुमच्या वाहनांमधून चोरी करु शकतात.

चोर हे चोरी करण्यासाठी फक्त संधीच्या शोधात असतो आणि बऱ्याचदा आपण नकळत पणे चोराच्या हातात आयतं कोलीतच देतो. ज्यामुळे संधी मिळताच हे चोर आपले हात साफ करतात. अनेकवेळा काही चोर दिवसा उजेडात आणि लोकांच्या गर्दीतही हात साफ करतात.

अलीकडच्या काळात असाच एक व्हिडीओ लोकांसमोर आला आहे. ज्यामध्ये चोरट्याने स्कूटीच्या डिक्कितून चावीशिवाय सामान चोरूत आहेत. या व्हिडीओतील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे चोरट्याने स्कूटीला कोणतीही हानी न करता आणि तिचे कुलूप न उघडता काही सेकंदात मौल्यवान वस्तू बाहेर काढल्या आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चोरीचा लाईव्ह डेमो पाहण्यासाठी पोलीस दुचाकी पार्किंगमध्ये पोहोचले आणि पकडलेल्या चोरट्यांना पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या स्कूटीमधून सामान चोरण्यास सांगितले, त्यानंतर दोन्ही चोरट्यांनी चोरी करण्यास सांगितले. 

त्यानंतर एका चोरट्याने स्कूटीची गादी वर खेचली आणि दुसऱ्या चोरट्याने त्या छोट्या जागेत हात टाकून आत ठेवलेली पर्स बाहेर काढली. चोरीचा हा प्रकार पाहून शेजारी उभे असलेले पोलिसही चक्रावून गेले.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांना आश्‍चर्य वाटले आणि कमेंट्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'हा चोर खरोखरच हुशार आहे, त्याची हा हात चलखी पाहून पोलिसही हादरले असतील.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओवर कमेंट करताना दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'भाईसाहेब! हातांची एवढी सफाई मी कधीच पाहिली नाही.'' याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी देखील या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

memes.bks नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ही बातमी लिहिपर्यंत या व्हिडीओला 40 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.