रिल बनवण्यासाठी जीव धोक्यात, धावत्या ट्रेनच्या दरवाजात तरुणीचा डान्स...Video व्हायरल

Viral Video : इंटरनेटच्या युगात सध्याची पीढी रिलच्या विळख्यात अडकली आहे. काही सेकंदाचा रिल बनवण्यासाठी तरुणाई जीव धोक्यात घालतेय. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर लोकांनी संताप व्यक्त केलाय. 

राजीव कासले | Updated: Jun 21, 2024, 05:29 PM IST
रिल बनवण्यासाठी जीव धोक्यात, धावत्या ट्रेनच्या दरवाजात तरुणीचा डान्स...Video व्हायरल title=

Viral Video : सोशल मीडियावर तरुणाईला सध्या रिल्स (Reels) बनवण्याचं व्यसन लागलं आहे. लाईक (Like) आणि व्ह्यूजसाठी (Views) ही तरुणाई जीव धोक्यात घालतेय. पुण्यात एका इमारतीवरुन एक तरुणी तरुणाचा हात धरुन लटकत स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता आणखी एक असाच धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक महिला धावत्या ट्रेनच्या दरवाज्यात उभं राहून डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर  @ChapraZila या अकाऊंटवरुन टाकण्यात आला आहे. हा व्हिडिओ  आतापर्यंत 85.6k लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी यावर संतप्त प्रतक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलंय, या मुलीचं मानसिक संतुलन बिघडलं असावं. तर एकाने म्हटलंय या देशात जीवापेक्षा व्ह्यूज आणि कमेंटची किंमत जास्त आहे. 

काय आहे व्हायरल व्हिडिओत
सोशल मीडियावर व्हायर होणाऱ्या व्हिडिओत एक तरुणी धावत्या ट्रेनच्या दरवाजात दिसतेय. बॅकराऊंडला हिंदी गाणं 'होगा तुमसे प्यारा कौन' वाजत असून यावर ती तरुणी डान्स करताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे मागे ट्रेन वेगाने धावताना दिसत आहे. दरवाजाच्या अगदी कडेला उभं राहुन ती स्टंट करताना दिसतेय. जरासा तोलही गेला तरी तिच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकलं असतं. पण याचा त्या तरुणीवर काहीही परिणाम जाणवत नाहीए. विशेष म्हणजे या तरुणीचा व्हिडिओ काढणारा व्यक्तीही तिला सावध करत नाहीए. 

पुण्यातील तरुण-तरुणीला अटक होणार?
त्याआधी गुरुवारी पुण्यातील एका का तरुण-तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पुणे-बंगळुरु महामार्गाजवळील एका पडीक इमारतीवर शूट करण्यात आला. या इमारतीच्या गच्चीवरुन तरुणी तरुणाचा हात धरुन खाली लटकताना दिसत आहे. . ग्रीप स्ट्रेंथ चेक म्हणजेच हाताची पकड किती घट्ट आहे हे तपासून पाहण्यासाठी स्टंटबाजी करत असल्याची कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आला होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. Reel बनवण्यासाठी जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरुण तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केलीय. 

दरम्यान, साताऱ्यात रिल बनवण्यच्या नादात एक तरुणी कार मागे घेताना काससकट खोल दरीत कोसळली, तिचा जागीच मृत्यू झाला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.