आताची सर्वात मोठी बातमी; विशाखापट्टणममध्ये गॅस गळती, 30 महिलांची प्रकृती नाजूक

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एका कंपनीत धोकादायक गॅस गळती झाल्याची घटना समोर आली आहे.

Updated: Jun 3, 2022, 05:11 PM IST
 आताची सर्वात मोठी बातमी; विशाखापट्टणममध्ये गॅस गळती, 30 महिलांची प्रकृती नाजूक   title=

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एका कंपनीत धोकादायक गॅस गळती झाल्याची घटना समोर आली आहे. या गॅस गळतीमुळे कंपनीत काम करणाऱ्या 30 महिलांची प्रकृती बिघडली आहे. या सर्व महिलांना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व महिलांवर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर कंपनीच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

विशाखापट्टणमच्या अच्युतापुरम येथील फोरास लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गॅस गळतीची घटना घडलीय. या घटनेत कंपनीत काम करणाऱ्या 30 महिलांना उलट्या, मळमळ आणि चक्कर येतेय. त्यामुळे या सर्व महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. या सर्व महिलांना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

विशाखापट्टणमचे एसपी गौतमी साळी यांनी सांगितले की, गॅस गळतीनंतर कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना चक्कर येऊन उलट्या होऊ लागल्या. या घटनेत 30 महिला आजारी झाल्या आहेत.सध्या सर्व महिलांची प्रकृती स्थिर आहे, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गौतमी साळी पुढे म्हणाले की, आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. कंपनीकडून निष्काळजीपणा आढळल्यास कारवाई केली जाईल.