आता विवेक बिंद्रांच्या अकाऊंटवरुन धक्कादायक पोस्ट, 'गंभीर आजारामुळे...'

Vivek Bindra Hospitalised:  विवेक बिंद्रा गेल्या आठवडाभरापासून गंभीर आजाराशी लढत असल्याचे त्यांच्या अकाऊंटवरुन सांगण्यात आले आहे.

Pravin Dabholkar | Updated: Feb 3, 2024, 02:11 PM IST
आता विवेक बिंद्रांच्या अकाऊंटवरुन धक्कादायक पोस्ट, 'गंभीर आजारामुळे...' title=
vivek bindra Health

Vivek Bindra Hospitalised: प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर आणि आपल्या दुसऱ्या पत्नीला बेदम मारहाणीमुळे चर्चेत आलेले विवेक बिंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांची तब्येत ढासळली असल्याचे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सांगण्यात आले आहे. दरम्यान विवेक बिंद्रा यांचे चाहते त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. 

काय म्हटलंय पोस्टमध्ये?

आमचे प्रिय डॉक्टर विवेक बिंद्रा गेल्या आठवडाभरापासून गंभीर आजाराशी लढत आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी डॉक्टर्स अथक प्रयत्न करत आहेत. विवेक यांचा आत्मविश्वास मजबूत असून देखील त्यांच्या आरोग्यात काही सुधारणा होताना दिसत नसल्याचे त्यांच्या अकाऊंटवरुन सांगण्यात आले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr Vivek Bindra (@vivek_bindra)

या परिस्थितीमुळे आणि आव्हानांमुळे ते 10 दिवसांचा एमबीए प्रोग्रामच्या 8 व्या दिवसाची शूटींग करु शकले नाहीत, असेही पुढे म्हटले आहे. विवेक बिंद्रा यांचे चाहते, शुभचिंतकांनी ते लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करावी. या कठीण प्रसंगात त्यांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

पत्नीला मारहाणीमुळे वादात 

नवविवाहीत पत्नी यानिकाला गंभीर स्वरुपात मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आल्याने विवेक बिंद्रा वादात सापडले. यानंतर त्यांच्या विरोधात यानिकाने घरगुती हिंसाचाराअंतर्गत तक्रारही दाखल केली. 7 डिसेंबर रोजी जवळपास 3 वाजता विवेक बिंद्रा आपल्या आई प्रभासोबत वाद करत होते. त्यांची पत्नी दोघांमध्ये आली. तेव्हा विवेकने पत्नीला एका खोलीत बंद केले आणि शिव्या दिल्या. विवेक एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी तिला मारहाणदेखील केली. 

संदीप महेश्वरींसोबत वाद 

प्रसिद्ध युट्यूबर संदीप महेश्वरींसोबत झालेल्या वादामुळे विवेक बिंद्रा चर्चेत आले होते. संदीप महेश्वरींनी मोठा घोटाळा उघड केल्याचा दावा एक व्हिडीओत केला. या प्रकरणानंतर विवेक बिंद्रा यांनीही व्हिडीओ बनवून प्रत्युत्तर दिले. संदीप महेश्वरी यांनी विवेक बिंद्राच्या 10 दिवस एमबीए प्रोग्रावरही प्रश्न उपस्थित केले. प्रतिष्ठीत संस्था 1 ते 3 वर्षे घेत असताना 10 दिवसात एमबीए कसे पूर्ण होईल? असा प्रश्न संदीप महेश्वरींनी उपस्थित केला.