Vodafone down : व्होडाफोन-आयडियाचे मोबाईल नेटवर्क गायब, लाखो ग्राहकांना फटका

Vodafone down : काही भागात शुक्रवारी (3 फेब्रुवारी) दुपारच्यावेळीत तासाभरापासून VI चे नेटवर्क गायब झाले होते. 

Updated: Feb 3, 2023, 03:09 PM IST
Vodafone down : व्होडाफोन-आयडियाचे मोबाईल नेटवर्क गायब, लाखो ग्राहकांना फटका

#VodafoneIdea: देशातील आघाडीची मोबाईल सेवा पुरवठादार असलेल्या व्होडाफोन-आयडियाचे मोबाईल (Vodafone down) नेटवर्क पुन्हा ठप्प  झाले आहे. अर्ध्या तासापासून अनेक भागात मोबाईलचे नेटवर्क (Mobile Network) डाऊन झाले. परिणामी याचा फटका लाखो ग्राहकांना बसला असून पुढचे काही तास नो सर्विस असे सांगण्यात आले आहे.  कंपनीच्या या ढिसाळ कारभारावर सोशल मीडियावर ग्राहकांकडून जोरदार टीका केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉलिग आणि इंटरनेट (calling and internet) सेवा ठप्प झाली आहे. जवळपास 1 तासांपासून ग्राहकांना अडचणी येत आहेत. नेटवर्क नसल्याने ग्राहकांना कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी देखील संपर्क करणे अवघड झाले आहे. काहींनी ट्विटरवर VI च्या नेटवर्कबाबत तीव्र नाराज व्यक्त केली. यामुळे ट्वीटरवर #Vodafone down #vodafone india हे व्होडाफोनचे टॅग ट्रेंडिंगमध्ये आले आहेत.