Marriage Video : लग्नात सासूचं 'असं' रुप पाहून नवदेवासोबत वऱ्हाडी अवाक्...

Viral Video :  लग्न म्हटलं की सगळ्यांचं लक्ष असतं ते नवरदेव आणि नवरीकडे...पण एका लग्नाच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण भर मंडपात नवरीऐवजी तिच्या आईचीच चर्चा होती.     

Updated: Feb 3, 2023, 03:05 PM IST
Marriage Video : लग्नात सासूचं 'असं' रुप पाहून नवदेवासोबत वऱ्हाडी अवाक्...
viral video bride groom mother in law danced to welcome the son in law wedding trending video on Social media

Trending Marriage Video :  सध्या सगळीकडे लग्नाचा (wedding Video) सिझन सुरु आहे. लवकरच कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra Kiara Advani wedding) लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. लग्न हा नवरदेव नवरीसोबतच दोन कुटुंबाच मिलन असतं. आज काल लग्न म्हणजे मोठा उत्सवच असतो. मेहंदी, हळद, संगीत आणि मग थाट्यामाट्यात लग्न...लग्नाला एक इव्हेंटच स्वरुप प्राप्त झालं आहे. लग्नाच्या व्हिडीओने सोशल मीडिया कायम गजबजलं आहे. नवरी आणि नवरदेवाची ग्रँण्ड एण्ट्री...तरुण तरुणीचा डान्स असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतं असतात. सध्या सोशल मीडियावर एका लग्नाचा (bride groom video) व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतं आहे. 

आलेले पाहुणेही थबकले

लग्न मंडपात नवरदेवाच्या स्वागतासाठी जोरदार तयार करण्यात आली होती. लग्नामध्ये नवरदेवाचं आणि व्याहीमंडळंचं स्वागत कसं जोरदार झालं पाहिजे. त्यात काही कमी राहिली तर रुसवे फुगवे होतात ते वेगळे... पण आजच्या सोशल मीडियाचा जगात वावरताना लग्नातील प्रत्येक विधी परंपरा किंवा लग्नातील इतर कार्यक्रम इतरांनापेक्षा कसे हटके होईल. याकडे सगळ्यांचा कल असतो. (viral video bride groom mother in law danced to welcome the son in law wedding trending video on Social media)

नवदेवासोबत वऱ्हाडी अवाक्...

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता...फुल आणि लाईटिंगने मंडप सजला आहे. पाहुण्याची रेलचेल सुरु असते...नवरदेव मंडपाच्या दारावर येतो आणि हे काय सासूबाईनी जे केलं त्यांनंतर नवरदेवासोबत वऱ्हाडी पण अवाक् झाले. 

या सासूबाईंनी जावयाच्या स्वागतासाठी डान्स केला...इतक्या सुंदर डान्स केली नवरी राहिली बाजूला लग्नात काय सोशल मीडियावरही फक्त त्यांचीच चर्चा सुरु आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम makeupartistrybyanupreet या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ नेटकरींनी खूप पसंत केलं आहे.