चीनला आणखी एक धक्का! 'ही' कंपनी भारतात उभारणार फॅक्टरी

कोरोना व्हायरसमुळे संकटात सापडलेल्या चीनला आणखी एक धक्का लागला आहे.  

Updated: May 18, 2020, 01:07 PM IST
चीनला आणखी एक धक्का! 'ही' कंपनी भारतात उभारणार फॅक्टरी  title=

मुंबई : कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा फटका हा चीनला बसला आहे. चीनच्या वुहानमधून कोरोनाचा विषाणू जगभर पसरला. यानंतर चीनवर सगळ्यास्तरावरून टीका होत आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आता चीनशी संबंध कमी केले आहेत. चीनमधील सर्व उत्पादन गुंडाळले आहेत.

या परिस्थितीत जर्मनीच्या शूज बनवणाऱ्या वॉन वेल्स (Von Wellx) कंपनीने चीनमधून आपलं उत्पादन बंद केलं आहे. या कंपनीने भारतात उत्पादन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. (चीनला धक्का, ही कंपनी संपूर्ण उत्पादन भारतात हलवण्याच्या तयारीत) 

 

आग्रात कंपनीची फॅक्टरी 

वॉन वेल्स ही हेल्थी फूटवेअर बनवण्याची लोकप्रिय कंपनी आहे. कंपनीने आताच चीनमधील सर्व उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीचं नवीन प्रोडक्शन आणि संपूर्ण यूनिट भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच भारतातील आग्रामध्ये प्रोडक्शन सुरू होणार आहे. यासाठी कंपनीने लॅट्रिक इंडस्ट्रीसोबत तडजोड केली आहे. 

जगभरातील प्रीमियम ब्रँड्सपैकी वॉन वेल्स एक ब्रँड 

ही कंपनी आपल्या फूटवेअरसाठी अतिशय लोकप्रिय आहे. या कंपनीच्या उत्पादनामुळे गुडघे आणि कंबरेचा त्रास असणाऱ्यांसाठी खूप आराम मिळाला आहे. या कंपनीचे शूज ८० देशांमध्ये विकले जातात. या कंपनीचे शूज वापरणाऱ्या लोकांची संख्या ही १० लाखाहून अधिक आहे. जगभरात ५०० हून अधिक रिटेल स्टोर्स आहेत. तसेच या कंपनीने ऑनलाईन विक्री देखील सुरू केली आहे.

मोबाईल बनवणारी कंपनी लावा त्यांचं संपूर्ण उत्पादन भारतात हलवण्याच्या तयारीत आहे. पुढच्या ५ वर्षांमध्ये लावा भारतात ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, असं लावा कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. 'लावा कंपनी मोबाईल आर ऍण्ड डी, डिझाईन आणि उत्पादन भारतात करणार आहे. या संधीची आम्ही वाट बघत आहोत', अशी प्रतिक्रिया लावा कंपनीचे भारताचे अध्यक्ष हरी ओम राय यांनी इकोनॉमिक टाईम्सशी बोलताना दिली. पुढच्या ६ महिन्यांमध्ये लावा भारतात ८० कोटी रुपये गुंतवणूक करेल, असंही हरी ओम राय यांनी सांगितलं.