धक्कादायक, चोरीचा संशय : झाडाला उलटे टांगले आणि झोडपले, Video व्हायरल

 धक्कादायक घटना. तरुणाने मोबाईल चोरला असल्याचा संशय घेण्यात आला. त्यानंतर झाडाला उलटे टांगले आणि मारहाण केली.  

धक्कादायक, चोरीचा संशय : झाडाला उलटे टांगले आणि झोडपले, Video व्हायरल

पाटणा : बिहार राज्यातील दरभंगामधील हिंगोली गावात धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने मोबाईल चोरला असल्याचा संशय घेण्यात आला. त्याने आपला गुन्हा कबुल करण्यासाठी मारझोड करण्यात आली. मात्र, आपण मोबाईल चोरला नाही असे सांगूनही त्याला जोरदार मारहाण केली. तसेच त्याला लोखंडी साखळीने बांधण्यात आले. त्यानंतर झाडाला उलटे टांगले आणि मारहाण केली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, मोबाईल संशायावरुन मारहाण केल्याप्रकरणी हिंगोली पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. मारहाण प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली. हिंगोली गावात एकाचा मोबाईल हरवला होता. त्यांनी शोध घेतला. परंतु मोबाईल सापडला नाही. त्यानंतर गावकऱ्यांना एका व्यक्तीचा संशय आला. त्याला चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतले. त्याला जबरदस्त मारहाण केली. 

तरुणाला मारहाण सुरू असताना गावातील इतर लोकही तिथे उपस्थित होते. मात्र सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. तसेच मारहाण करून झाल्यावर त्या व्यक्तीला हात पाय बांधून झाडाला उलटे टांगले होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली.