VIDEO : ममता बॅनर्जी बॅडमिंटन खेळतात तेव्हा...

व्हिडिओ पोस्ट करत त्या म्हणतात... 

Updated: Jan 6, 2019, 01:21 PM IST
VIDEO : ममता बॅनर्जी बॅडमिंटन खेळतात तेव्हा... title=

मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडिओंनी २०१८ हे वर्ष गाजवलं. त्यामागोमागच आता यंदाचं वर्षही या व्हायरल व्हिडिओ गाजवणार असंच चित्र दिसत आहे. २०१९ च्या सुरुवातीलाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून, तो राजकीय वर्तुळातही प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, हा व्हिडिओ आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा. 

खुद्द बॅनर्जी यांनीच त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्या बॅडमिंटन या खेळाचा आनंद घेताना दिसत आहेत. दुहेरी प्रकारातील बॅडमिंटन या खेळाचा आनंद घेणाऱ्या बॅनर्जी यांचा उत्साह पाहण्याजोगा आहे. 

तृणमूल काँग्रेसप्रमुख ममता बॅनर्जी यांना राजकारणाशिवाय चित्रकला आणि लेखन या क्षेत्रांमध्येही रस आहे. खेळांवरही त्यांचं विशेष प्रेम. त्यामुळे त्यांचा हा व्हिडिओ विशेष गाजत आहे. मुख्य म्हणजे साडी नेसूनही त्या मोठ्या सराईताप्रमाणे हा खेळ खेळत आहेत. 

'आम्हाला खेळ आवडतात आणि हा खेळ तर, आमच्या गावाकडे सर्वाधिक खेळला जाणारा खेळ आहे', असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला. बॅडमिंटन या खेळाकडे अनेकांचच आकर्षण असतं, त्यातही दोन्ही बाजूचे खेळाडू हे मोठ्या कौशल्याने खेळत असले की हा खेळ पाहण्याची मजा काही औरच. त्यामुळे नेहमीच पी.व्ही.सिंधू आणि सायना नेहवालचा खेळ पाहणाऱ्यांसाठी बॅनर्जी यांचा हा व्हिडिओ कुतूहलाचा विषय ठरत आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x