...तर आपण सगळे मिळून टाळू शकतो कोरोनाची तिसरी लाट? फक्त ही गोष्ट करा

सरकारने कोरोना विषाणूविरूद्ध अवलंबले जाणारे सुरक्षेचे नियम मोडू नका. किंवा त्याकडे दुर्लक्ष करु नका असे आवाहन लोकांना केलं आहे.

Updated: Jun 22, 2021, 09:20 PM IST
...तर आपण सगळे मिळून टाळू शकतो कोरोनाची तिसरी लाट? फक्त ही गोष्ट करा

नवी दिल्ली : यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरच्या सुमारास कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. सरकारने कोरोना विषाणूविरूद्ध अवलंबले जाणारे सुरक्षेचे नियम मोडू नका. किंवा त्याकडे दुर्लक्ष करु नका असे आवाहन लोकांना केलं आहे.

तिसर्‍या कोविड लाटेवर भाष्य करताना नीती आयोगाचे डॉ. व्हीके पॉल म्हणाले की, परिस्थिती नाजूक आहे आणि लोकांनी शिस्त पाळण्याची गरज आहे. त्यांनी आठवण करून दिली की कोरोनाचे नियम योग्य पद्धतीने पाळल्या गेले आणि लसीकरण झाले तर तिसऱ्या लाटेचा धोका कमी होऊ शकतो.

व्ही.के. पॉल म्हणाले की, 'जर आपण कोविड नियमाचे पालन केले आणि लस घेतली तर लाटेचा परिणाम कमी होईल. असे बरेच देश आहेत जेथे दुसरी लाटसुद्धा आली नाही. जर आपण कोविडचे नियम नीट पाळले तर ही वेळ निघून जाईल.

शनिवारी एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी असा इशारा दिला होता की, जर लोकांनी मास्क घालणे बंद केले, सामाजिक अंतर टाळले आणि इतर कोविड नियमांकडे दुर्लक्ष केले तर येत्या सहा ते आठ आठवड्यांत तिसऱ्या लाटेचा धोका टाळू शकतो.

गुलेरिया म्हणाले की, आतापर्यंत देशातील केवळ काही टक्के लोकसंख्येवर लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, आज भारतात 50 हजार पेक्षा कमी नवीन कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. ही संख्या गेल्या 91 दिवसातील सर्वात कमी वाढ आहे.

आज एकूण 42,640 कोविड रुग्णांची नोंद झाली असून 1,167 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूची संख्या वाढून  3,89,302  झाली आहे.

ANI च्या अहवालानुसार, जागतिक आरोग्य संघटना आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेने केलेल्या सेरोप्रैव्हलेन्स अभ्यासानुसार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांवर एकसमान परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.