Armed Police : जाणून घ्या सशस्त्र पोलीस दल म्हणजे काय, कसं आणि कुठे करतात काम

या कायद्याअंतर्गत सशस्त्र पोलीस दलाची सविस्तर माहिती मिळते. 

Updated: Apr 7, 2022, 12:14 PM IST
Armed Police : जाणून घ्या सशस्त्र पोलीस दल म्हणजे काय, कसं आणि कुठे करतात काम  title=

मुंबई : देशातील विविध राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था (Law and order) राखून ठेवण्यासाठी पोलीस दलांवर मोठी जबाबदारी असते. सदर व्यवस्थेसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस दल विविध स्तरांवर काम करताना दिसतं. सर्वसामान्यपणे पोलीस दलात दोन तुकड्या असतात. एक, नागरी पोलीस आणि दुसरं म्हणजे सशस्त्र पोलीस. आज इथं आपण जाणून घेणार आहोत, सशस्त्र पोलीस दल म्हणजे नेमकं काय आणि ते कसं काम करतं याबाबत.... (Armed police)

पोलीस रेग्युलेशन कायद्यातील कलम 65 पासून कलम 69 पर्यंत सशस्त्र पोलिसांची माहिती देण्यात आली आहे. या कायद्याअंतर्गत सशस्त्र पोलीस दलाची सविस्तर माहिती मिळते.

सशस्त्र पोलीस दलातील सेवेत असणाऱ्या जवानांना सरकारी संपत्तीचं संरक्षण, कारागृह संरक्षण, कैदी आणि सरकारी कोषावर नजर ठेवणं, आयुद्ध भांडार, घातक गुन्हेगारांविरोधातील कारवाई या साऱ्यासाठी तैनात केलं जातं.

देशातील विविध राज्यांमध्ये सशस्त्र पोलिसांना तितक्याच बहुविध नावांनी ओळखलं जातं. कोणा एका राज्यात त्यांना विशेष सशस्त्र पोलीस (Special armed police), सशस्त्र काँन्स्टेब्युलरी, प्रांतीय सशस्त्र काँन्स्टेब्युलरी आणि राज्य सैन्य पोलीस (state military police) अशा नावांनी संबोधलं जातं.

सशस्त्र पोलिसांना विविध नावांनी ओळखलं जात असलं तरीही त्यांचं एकत्रीकरण हत्यारं, उपकरण आणि कार्यपद्धती एकसारखीच आहे.

जिल्हा सशस्त्र पोलीस

प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत आग्नेयास्त्रांचं प्रशिक्षण असणाऱ्या पोलिसांचंही एक पथक तयार करण्यात येतं. अशा तुकड्यांना सशस्त्र जिल्हा पोलीस म्हणून ओळखलं जां. स्थानिक प्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली ही तुकडी काम करते.

ही तुकडी राज्य सशस्त्र पोलीस पथकाचा भाग नसते. जिल्ह्यातील अधिकारी, संसदीय सदस्य, आमदार – खासदार यांच्या संरक्षणासाठी गनर अर्थात बंदुकधारी व्यक्ती, पीएसओ म्हणून ही मंडळी सेवेत असतात. व्हीआयपी व्यक्तींसाठीही यांचं संरक्षण दिलं जातं.