Interesting Fact : Toothpaste च्या ट्यूबवर असणाऱ्या या रंगांचा नेमका अर्थ काय?

कधी तुम्ही Toothpaste च्या ट्युबला व्यवस्थित पाहिलंय? प्रत्येक पेस्टच्या खालच्या भागावर हिरव्या, लाल आणि काळ्या रंगांच्या लहानश्या पट्ट्या असतात. 

Updated: Dec 2, 2022, 07:48 AM IST
Interesting Fact : Toothpaste च्या ट्यूबवर असणाऱ्या या रंगांचा नेमका अर्थ  काय?  title=
what is the meaning of colour mark on a toothpaste tube latest marathi news

Interesting Fact : एखादी वस्तू डोळ्यांसमोर येताच तिच्याबाबतचं निरीक्षण तुम्ही कधी केलंय का? जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं निरिक्षण करतो, तेव्हाच तिच्यातील बारकावे आपल्या लक्षात येतात आणि मग हे असंच का, ते तसंच का असे प्रश्नही आपल्या मनात घर करु लागतात. आता टूथपेस्टचंच घ्या. कधी तुम्ही Toothpaste च्या ट्युबला व्यवस्थित पाहिलंय? प्रत्येक पेस्टच्या खालच्या भागावर हिरव्या, लाल आणि काळ्या रंगांच्या लहानश्या पट्ट्या असतात. पण, यामागचा अर्थ माहितीये का तुम्हाला? (what is the meaning of colour mark on a toothpaste tube ) 

निळ्या रंगाची पट्टी असल्यास... 

सोशल मीडियावर काही ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार टूथपेस्टवर असणाऱ्या निळसर रंगाच्या पट्टीचा अर्थ त्या पेस्टमध्ये औषधं आहेत. हिरवी पट्टी दिसल्यास ती पूर्णपणे नैसर्गिक असल्याचं म्हटलं जातं. तर, लाल रंगाची पट्टी असल्यास टूथपेस्टमध्ये नैसर्गिक आणि रासायनिक घटकांचा वापर करण्यात आला आहे, असा अर्थ होतो. काळ्या रंगाची पट्टी एखाद्या टूथपेस्टवर असेल तर ती पूर्णपणे रासायनिक पेस्ट असल्याचं म्हटलं जातं. पण, हे सर्व खोटं आहे. (Color code on toothpaste)

हेसुद्धा वाचा : Good Morning! काल तुम्ही स्वप्नात एखादी स्त्री पाहिलीये का? जाणून घ्या त्यामागचा अर्थ 

सोशल मीडिया आणि इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार काळ्या आणि लाल रंगांच्या पट्ट्या असणाऱ्या पेस्टमध्ये रसायनांचा वापर करण्यात आल्यामुळे त्यांचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्याऐवजी निळ्या आणि हिरव्या पट्ट्याच असणाऱ्या पेस्ट वापरण्याचा सल्लाही अनेकांनी दिला. पण, खरंच असं आहे का? 

तुम्ही या चुकीच्या माहितीला बळी पडू नका 

टूथपेस्टच्या खालच्या भागात असणाऱ्या या पट्ट्या म्हणजे एक प्रकारचा बारकोड आहे. त्याचा संबंध पेस्टमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांशी होत नसतो. उलटपक्षी या पट्ट्या तुमच्याआमच्या काहीही कामाच्याही नाहीत. कारण, हे रंग ट्यूब बनवणाऱ्या मशिनमध्ये असणाऱ्या लाईट सेन्सरला ट्यूब कोणती आहे आणि ती कोणत्या आकारात बनवायची आहे यासंबंधिचे संकेत देतात. ही भाषा फक्त लाईट सेन्सरच समजू शकतात.