ज्ञानवापीमधील हिऱ्याचं रहस्य काय ? शापित हिरा... सत्य की अफवा ?

ज्ञानवापीचा वाद सुरु असतानाच कहाणीला आता नवं वळण लागलं आहे

Updated: May 22, 2022, 05:57 PM IST
ज्ञानवापीमधील हिऱ्याचं रहस्य काय ? शापित हिरा... सत्य की अफवा ? title=

Gyanvapi Case Row : वाराणसीच्या ज्ञानवापीमध्ये शिवलिंग आहे की कारंजं यावरून वाद सुरू असतानाच आता या शिवलिंगावर एकेकाळी असलेला एक अमुल्य हिरा चर्चेत आलाय. त्यामुळे आता ज्ञानवापीच्या सुरस कहाणीला नवं वळण लागलंय. 

ज्ञानवापीमध्ये सापडलेलं हे शिवलिंग असल्याचा हिंदू पक्षकारांचा ठाम दावा आहे.  या शिवलिंगावर शेकडो वर्षांपूर्वी एक हिरा जडवला असल्याचं सांगितलं जातं.  गोवळकोंडा इथल्या एका खाणीत हा हिरा सापडला होता.  हा हिरा शापित असल्यामुळे ते वाराणसीमध्ये भगवान शंकराला अर्पण करण्यात आला, अशी अख्यायिका आहे. 

या कथेमधला शापित हिरा सध्या कुठे आहे, याची कुणालाच माहिती नाही. त्यामुळे ही कथा खरी आहे की काल्पनिक हे सांगता येणं कठीण आहे. मात्र यामुळे ज्ञानवापीमधील शिवलिंगाची चर्चा नव्यानं सुरू झाली आहे. 

मुस्लीम खासदाराचं वक्तव्य
दरम्यान, समाजवादी पक्षाचे (SP) खासदार शफीकुर्रहमान बर्क (Shafiqur Rahman Barq) यांनी रविवारी दावा केला की वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत 'शिवलिंग' नाही. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही परिस्थिती निर्माण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
 
शफीकुर्रहमान बर्क यांनी या पुढे म्हटले आहे की, आमच्याकडून मशीद कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. कितीही त्याग करावा लागला तरी मरेपर्यंत ज्ञानवापी सोडणार नाही. मुस्लिमांकडून कोणीही ज्ञानवापी घेऊ शकत नाही.' असं त्यांनी म्हटलं आहे.