चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? टेन्शन घेऊ नका, फक्त हे काम करा; झटक्यात येतील पैसे

अशी परिस्थिती उद्भवली तर आपण काय करावं? हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं, तर आज आम्ही तुम्हाला यासंदर्भात माहिती सांगणार आहोत.

Updated: Apr 6, 2022, 04:55 PM IST
चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? टेन्शन घेऊ नका, फक्त हे काम करा; झटक्यात येतील पैसे title=

मुंबई : आपल्यापैकी बरेच लोक आता बँकेशी संबंधीत कामांसाठी ऑनलान बँकिंग आणि UPI च्या पर्यायांकडे वळले आहेत. यामुळे लोकांचा वेळ वाचतो आणि कोणत्याही वेळी पैसे पाठवणे यामुळे सहज सोप्पं होतं. परंतु यामुळे अनेक समस्या देखील लोकांना उद्भवू लागल्या आहेत. अनेक वेळा लोकांकडून ऑनलाइन बँकिंगमध्ये चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात. यामध्ये आपण एक जरी अंक चुकीचा टाकला तरी आपल्याला ही समस्या उद्भवू लागले.

परंतु जर अशी परिस्थिती उद्भवली तर आपण काय करावं? मला ते पैसे परत कसे मिळतील? हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं, तर आज आम्ही तुम्हाला यासंदर्भात माहिती सांगणार आहोत.

ताबडतोब बँकेला कळवा

जर तुमच्यासोबतही असे घडले असेल, तर लगेच तुमच्या बँकेला कळवा. कस्टमर केअरला कॉल करा आणि त्यांना संपूर्ण गोष्ट सांगा. जर बँकेने तुम्हाला ई-मेलवर सर्व माहिती विचारली, तर त्यात या चुकीने झालेल्या व्यवहाराची संपूर्ण माहिती द्या. ट्रान्झॅक्शनची तारीख आणि वेळ, तुमचा खाते क्रमांक आणि ज्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले ते नमूद केल्याचे सुनिश्चित करा.

जर चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असतील, तर पैसे परत मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो. तुम्ही प्रथम त्या बँकेच्या शाखेत जा आणि त्याच्या मॅनेजरला याबद्दल माहिती द्या. कारण तुम्ही तुमच्या बँकेतून जाणून घेऊ शकता की, कोणत्या शहरातील कोणत्या शाखेत पैसे कोणत्या खात्यात ट्रान्सफर झाले आहेत.

तुम्ही त्या शाखेशी बोलून तुमचे पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करू शकता. तुमच्या माहितीच्या आधारे बँक त्या व्यक्तीला कळवेल ज्याच्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत. यानंतर, बँक त्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित केलेले पैसे परत करण्याची परवानगी मागते.

चुकून पैसे ट्रान्सफर झाले, त्याने परत करण्यास नकार दिला तर? 

ज्या व्यक्तीच्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले, त्याने परत करण्यास नकार दिला, तर त्याच्याविरुद्ध न्यायालयात खटलाही दाखल केला जाऊ शकतो. तथापि, पैसे परत न केल्यास, हा अधिकार रिझर्व्ह बँकेच्या नियमांच्या उल्लंघनाच्या संदर्भात येतो.

बँकांसाठी आरबीआयच्या सूचना

जेव्हा तुम्ही बँक खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता तेव्हा तुम्हाला एक मेसेज येतो. त्यात असेही लिहिले आहे की, जर व्यवहार चुकीचा असेल, तर कृपया हा मेसेज या नंबरवर पाठवा. आरबीआयने बँकांना सूचनाही दिल्या आहेत की, जर चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले, तर बँकेला लवकरात लवकर कारवाई करावी लागेल. तसेच तुमचे पैसे चुकीच्या खात्यातून योग्य खात्यात परत करण्याची जबाबदारी देखील बँकेची आहे.