फेस्टीव्ह सीजनमध्ये का वाढले Heart Attack चे प्रमाण? यामुळं जातोय तरुणांचा जीव!

Heart Attack While Playing Garba In Marathi: गरबा खेळताना चक्क १० जणांचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. हे नेमकं कसं आणि कशामुळं घडलं, हे जाणून घेऊया.   

Updated: Oct 23, 2023, 02:48 PM IST
फेस्टीव्ह सीजनमध्ये का वाढले Heart Attack चे प्रमाण? यामुळं जातोय तरुणांचा जीव! title=
Whats Leading to Heart Attack Deaths at Garba Events in marathi

Heart Attack While Playing Garba: देशात सध्या नवरात्रौत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतोय. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रासगरबा व दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईसह गुजरातमध्ये मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणाईही मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहे. या दरम्यान एक दुःखद घटना समोर आली आहे. गुजरातमध्ये गेल्या 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये किशोरवयीन मुलांसह मध्यमवयीन लोकांचा समावेश आहे. 

अहमदाबादमध्ये 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यांच्या मृत्यूमागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. यातील काही जणांना हृदयासंबंधीत आजार असल्याची नोंद करण्यात आली आहे. गुजरातमध्ये झालेले मृ्त्यू हे हार्ट अटॅकने झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी 17 वर्षांचा मुलगा हा सर्वात लहान होता. तरुणांमध्ये हार्ट अॅटक येण्याचे प्रमाण वाढले असल्याचंही बोललं जात आहे. गरबा किंवा दांडियाच्या उत्सवात असलेल्या आवाजामुळं हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असंही म्हटलं जातं आहे. पण खरंच डीजेचा दणदणाटामुळं हृदयविकार येऊ शकतो का? 

दरम्यान, महाराष्ट्रातही गणशोत्सवाच्या मिरवणुकीत दोन जणांचा डीजेमुळं मृत्यू झाला होता. सांगलीतील येथील दोन व्यक्ती मिरवणुकीत असताना दोघही चक्कर येऊन पडले. त्यानंतर काहीच वेळाच त्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने दोघांचा मृत्यू झाला असून याला  डीजेच्या दणदणाट कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

हृदयविकाराचे कारण काय?

आजकाल आपण बघतो की मिरवणुकांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये सर्रास डॉल्बीचा वापर केला जातो. त्यामुळं ध्वनीप्रदुषण होते. ज्यावेळी आवाज जास्त असतो तेव्हा हृदयातील नसा या आंकुचन पावतात. त्यामुळं रक्तदाब वाढतो. ज्या लोकांना आधीपासून हृदयविकाराचा धोका आहे. त्यांना ध्वनिप्रदुषणामुळं हृदयाच्या नसा आंकुचित होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची व मेंदूचा पक्षाघात होण्याची शक्यता असते. त्यामुळं अशा लोकांनी जिथे जोरात डिजेचा आवाज आहे त्याठिकाणी जाणे टाळावे, अशी माहिती हृदयरोग तज्ञ डॉ. रियाज मुजावर यांनी दिली आहे. 

ध्वनीप्रदुषणामुळं हृदयविकाराचा धोका वाढतो

हृदय विकार आणि ध्वनी प्रदूषण यांचा थेट संबंध असल्याचे एका अहवालातून समोर आले होते. ज्या ठिकाणी गोंधळाचे आणि आवाजाचे प्रमाण जास्त आहे म्हणजेच ध्वनी प्रदुषणाची तीव्रता अधिक आहे तिथल्या लोकांमध्ये हृदयविकाराची समस्या अधिक तीव्रतेने जाणवते. या परिसरातून हृदयविकाराचे प्रणाण 72 टक्क्यांनी वाढते. या अहवालानुसार 20 पैकी 1 मृत्यू हा ध्वनी प्रदुषणामुळं होते.