नवी दिल्ली : रब्बी विपणन हंगामात 2021-22 मध्ये सुरळीत कामकाज सुरू झाल्याने 9 मेपर्यंत एकूण 337.95 एलएमटी गहूची खरेदी करण्यात आलीय. गेल्यावर्षी 248.021 एलएमटी गहू खरेदी करण्यात आली होती. च्या तुलनेत खरेदी करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे 34.07 लाख शेतकर्यांना लाभ मिळाला आहे जो मागील वर्षी 28.15 लाख होता.अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे (Food and Public Distribution Department)सचिव सुधांशु पांडे यांनी याबद्दल माहिती दिली.
भारतभरातील 19,030 खरेदी केंद्रांमार्फत ही खरेदी करण्यात आली आहे.शेतकर्यांना कोणताही उशीर न करता त्यांच्या पिकाची देशभरात विक्री (Wheat procurement across India)) केल्याचा थेट फायदा होत आहे. डीबीटीच्या एकूण देय पैकी आतापर्यंत 49,965 कोटी रुपये गहू खरेदीसाठी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. पंजाबमध्ये 21,588 कोटी आणि हरियाणामध्ये सुमारे 11,784 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.
पंतप्रधान गरीब कल्याण योजना दोन महिन्यांसाठी अर्थात मे आणि जून 2021 पर्यंत राबविली जात आहे. अशाच पद्धतीनुसार, दरमहा प्रत्येक व्यक्तीला पाच किलो दराने, सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना अतिरिक्त धान्य दिले जाईल. 26,000 कोटींपेक्षा वरील सर्व खर्च भारत सरकार देणार असल्याचे पांडे म्हणाले.
विभाग या योजनेचा सातत्याने आढावा घेऊन व्यापक रुप देण्यात येणार आहे. (The plan is constantly being reviewed) जारी केलेल्या सल्ल्यानुसार कोविड संबंधित सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केल्यानंतर ईपीओएस उपकरणांद्वारे पारदर्शक पद्धतीने धान्य देण्यात येणार आहे. वितरण सुनिश्चित करण्यासाठी सर्व राज्यांना सोबत घेऊन काम सुरु आहे. यासंदर्भात 26 एप्रिल रोजी सेक्रेटरी आणि 5 मे 2021 रोजी सहसचिव यांच्यासोबत एक बैठकही घेण्यात आल्याचे पांडे म्हणाले.