'Hight देख के कमजोर मत समजना, फायर है में...' घरी आलेल्या व्यक्तीसोबत यानं काय केलं एकदा पाहाच

 सोशल मीडिया हे असं प्लॅटफ़ॉर्म आहे, जेथे तुम्हाला नेहमीच मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतात.

Updated: Mar 11, 2022, 09:59 PM IST
'Hight देख के कमजोर मत समजना, फायर है में...' घरी आलेल्या व्यक्तीसोबत यानं काय केलं एकदा पाहाच title=

मुंबई : सोशल मीडिया हे असं प्लॅटफ़ॉर्म आहे, जेथे तुम्हाला नेहमीच मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही त्याला एकदा सुरू केलं की, आणखी एक व्हिडीओ, आणखी एक व्हिडीओ असं करत, तासन तास त्याच्यामध्ये अडकता. येथे लोकांना त्याच्या आवडीचे कन्टेन्ट पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ ट्रेंड करेल हे काही तुम्ही सांगू शकत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. ज्यामध्ये असं काहीतरी घडतं, जे पाहून तुम्हीला आधीतर यामध्ये काय घडलं हे समजणारचं नाही. ज्यामुळे तुम्ही तो व्हिडीओ दोनदा तरी पाहाल.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर एखाद्या गोष्टीवरून रागावत आहे. पण दुसरा व्यक्ती त्या ओरडत असलेल्या व्यक्तीपेक्षा उंचीने खूपच लहान आहे, त्यामुळे तो काहीही करू शकत नाही. परंतु या उंच व्यक्तीचं बोलणं ऐकून हा लहान व्यक्ती अचानक चिडतो आणि घराच्या आता जातो.

आपल्याला पाहून वाटतं की, हा घाबरुन आत गेला. परंतु तो तेवढ्यात एक खुर्ची घेऊन येतो आणि त्यावर उभा राहून या उंच व्यक्तीला जोरात कानाखाली वाजवतो. त्याचा हा सायलंट किलिंग अंदाज लोकांना फार आवडला आहे. शब्दांनी काहीही न बोलता त्याने एक कानाखाली लावत समोरच्याला शांत केलं. म्हणून या व्यक्तीला पुष्पा सिनेमाती पुष्पराज असल्याचं नेटीझन्स म्हणत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांना या व्यक्तीची स्टाईल फारच आवडली आहे. लोकांनी या व्हिडीओला आपल्या मित्रांसोबत देखील शेअर केलं आहेत या मनोरंजक व्हिडीओने लोकांना वेड लावलं आहे.

हा व्हिडीओ पाहून अंदाज बांधता येतो की, हे एखाद्या चित्रपटातील दृश्य आहे. एका व्यक्तीने या व्हिडीओवर कमेंट केली आहे, की या व्यक्तीकडे ताकद नसली, तरी त्याच्याकडे डोकं आहे.