Ratan Tata vs Gangster: रतन टाटा (Ratan Tata) हे नाव माहिती नाही असा भारतीय व्यक्ती सापडणं अशक्य आहे. रतन टाटा हे फक्त उद्योग नाही तर प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीसाठी आदर्श आहेत. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात त्यांचे चाहते आहेत. इतक्या मोठ्या पदावर असतानाही त्यांचा साधेपणा सर्वांचं लक्ष वेधून घेतो. पण तुम्हाला माहिती आहे का, रतन टाटा यांचा सामना एकदा गँगस्टरशी झाला होता. या गँगस्टरला कंपनीतील कर्मचारीही घाबरले होते. पण रतन टाटा यांनी धैर्याने त्याचा सामना केला आणि विजय मिळवला. रतन टाटा यांनीच एकदा हा किस्सा सांगितला होता.
देशातील सर्वात जुन्या उद्योजक कुटुंबातील एक Tata Group चे माजी चेअरमन रतन टाटा यांचा एक जुना व्हिडीओ सध्या नव्याने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सर्वात आधी 2015 मध्ये शेअर करण्यात आला होता. दरम्यान, कोलंबिया बिजनेस स्कूलने पुन्हा एकदा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत रतन टाटा यांनी गँगस्टरचा सामना केल्याचा आणि विजय मिळवल्याचा उल्लेख केला आहे. त्यावेळी रतन टाटा यांच्याकडे टाटा सन्सचं चेअरमनपद सोपवण्यात आलं होतं. ही जबाबदारी खांद्यावर घेऊन त्यांना फक्त 15 दिवस झाले होते.
ही घटना 1980 च्या आसपासची आहे. रतन टाटा यांनी सांगितलं होतं की, एक गँगस्टर त्यांच्या कंपनीकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करत होता. "मी चेअरमन झाल्यानंतर 15 दिवसातच टाटा मोटर्सच्या युनियनमध्ये मोठा गदारोळ झाला होता. एक बाहेरील व्यक्ती होती...एक गँगस्टर, ज्याला आमच्या युनिअनचा ताबा घ्यायचा होता आणि नियंत्रण घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याची जवळपास 200 लोकं होती, जी फार हिंसक आणि भीतीदायक होती", असं त्यांनी सांगितलं होतं.
"कंपनीत काम करणाऱ्या 4000 कर्मचाऱ्यांना याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. कंपनी व्यवस्थापनाने त्यावेळी आमच्या कर्मचारी संघटनेला फार गांभीर्याने घेतलं नव्हतं. दरम्यान या गँगस्टरने युनिअनवरील आपलं नियंत्रण स्थापित करण्यासाठी आंदोनलाचं आव्हान केलं होतं. ज्यामुळे टााट मोटर्सच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या भीतीपोटी काम बंद करावं लागलं होतं. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत मी बरेच दिवस स्वत: प्लांटमध्ये थांबलो होतो आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात व प्रोडक्शन पुन्हा सुरु कऱण्यासाठी तयार केलं," अशी माहिती त्यांनी दिली होती.
रतन टाटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गँगस्टरला टाटा मोटर्सच्या युनिअनवर पूर्ण नियंत्रण मिळवायचं होतं आणि आम्ही असं काही होऊन देऊ शकत नव्हतो. यामुळे आम्ही त्याचा सामना केला. रतन टाटा यांनी त्यावेळच्या प्रत्येक क्षणाची माहिती दिली आहे. गँगस्टरने कथितपणे कंपनीच्या 400 कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी आपल्या लोकांना आणलं होतं. पोलीसही त्याच्या खिशात होते. पण असं असतानाही रतन टाटा मजबुतीने उभे राहिले आणि त्यांचा सामना केला.
"मला त्यावेळी प्रकरण मिटवण्यासाठी अनेक सल्ले देण्यात आले होते. पण यानंतरही मी दुसरा मार्ग निवडला आणि त्याचा सामना करण्याचं ठरवलं. जर मी असं केलं नसतं तर टाटा मोटर्सची युनिअन गँगस्टर युनिअन झाली असती," असं रतन टाटा म्हणाले. रतन टाटा यांनी यावेळी घाबरेलल्या कर्मचाऱ्यांना दोष दिला नाही आणि दुसरा मार्ग निवडला. रतन टाटा यांनी धैर्य दाखवल्याने अखेर तो गँगस्टर पकडला गेला. व्हिडीओच्या शेवटी रतन टाटा यांनी जर मी हे काम दुसऱ्या पद्धतीने केलं असतं तर झालं कधी झालं नसतं असंही सांगितलं.