रेल्वे प्रवासाच्या तिकिटावर 'या' सेवांचा लाभ तुम्ही घेऊ शकता, जाणून घ्या संपूर्ण माहिती

हे तिकीट तुम्हाला फक्त ट्रेनमध्ये बसण्याचा अधिकार देत नाही, तर या ट्रेनच्या तिकीटामुळे तुम्ही आणखी काही गोष्टींचा लाभ देखील घेऊ शकता.

Updated: Sep 16, 2021, 04:24 PM IST
रेल्वे प्रवासाच्या तिकिटावर 'या' सेवांचा लाभ तुम्ही घेऊ शकता, जाणून घ्या संपूर्ण माहिती title=

मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी ट्रेनने प्रवास केला आहे. छोट्या काही तासांच्या प्रवासापासून ते एक ते दोन दिवसांचा प्रवास ट्रेनने केला जातो. ट्रेनने प्रवास करण्यासाठी त्याचे तिकीट काढणे गरजे असते आणि लांबच्या प्रवासासाठी रेल्वेचं रिजर्वेशन तिकीट घ्यावं लागतं ज्यामुळे लोकांना आरामदायी प्रवास करता येतो. परंतु ट्रेनने प्रवास करण्यासाठी काढलेलं तिकीटाबद्दल तुम्हाला ही महत्वाची गोष्ट माहित आहे का?

ट्रेनचे हे तिकीट तुम्हाला फक्त ट्रेनमध्ये बसण्याचा अधिकार देत नाही, तर या ट्रेनच्या तिकीटामुळे तुम्ही आणखी काही गोष्टींचा लाभ देखील घेऊ शकता, याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अशा परिस्थितीत, हे जाणून घ्या की जेव्हा तुम्ही ट्रेनचे तिकीट खरेदी करता, तेव्हा तुम्ही कोणत्या सेवांचा लाभ घेऊ शकता 

विमा

जर तुम्ही तिकीट बुक करताना विमा घेतला तर तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. रेल्वे प्रवास विमा अंतर्गत, ट्रेनने प्रवास करताना तुमचा मृत्यू किंवा तात्पुरते अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात. हा विमा अपघात रेल्वे अपघात किंवा प्रवासादरम्यान तत्सम परिस्थितीच्या बाबतीत खूप उपयुक्त आहे. कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व असल्यास, विम्याचे संरक्षण 7.5 लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच या काळात रुग्णालयात दाखल आणि उपचारांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत विमा उपलब्ध आहे. ही रक्कम मृत्यू आणि अपंगत्व कव्हरेजपेक्षा जास्त आहे.

या विमा अंतर्गत रेल्वे अपघात, चोरी, डकैती किंवा अशा कोणत्याही परिस्थितीसाठी कव्हरेज उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला फक्त 49 पैसे खर्च करावे लागतील.

प्रथमोपचार पेटी

जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये जाता आणि तुम्हाला प्रवासादरम्यान औषध इत्यादींची आवश्यकता असते, तेव्हा तुम्ही TTE कडून त्याची मागणी करू शकता. प्रत्येक प्रवाशाला रेल्वेने ही सुविधा दिली आहे.

वेटिंग रूम

जर तुमच्याकडे तिकीट असेल तर तुम्ही तुमच्या तिकिटाच्या वर्गानुसार वेटिंग रूममध्ये सहज आराम करू शकता. यासाठी तुम्हाला रेल्वेने सुविधा दिली आहे आणि ट्रेन येईपर्यंत तुम्ही इथे बसू शकता.

वायफाय

जर तुम्ही ट्रेनची वाट पाहत असाल आणि तुम्ही स्टेशनवर असाल तर तुम्ही मोफत वायफायचा आनंद घेऊ शकता. आता ही सुविधा बहुतेक रेल्वे स्थानकांवर उपलब्ध आहे.

क्लोक रूमची सुविधा

ज्या लोकांकडे ट्रेनची तिकिटे आहेत ते स्टेशनवरील क्लोक रूम वापरू शकतात आणि त्यांचे सामान जमा करू शकतात.