सरकारी की खासगी शाळा चांगली? पाहा काय सांगतोय अहवाल

खासगी की सरकारी कोणती शाळा चांगली? कोणत्या शाळेत मुलांची अॅडमिशन कराल

Updated: Feb 24, 2022, 09:10 PM IST
सरकारी की खासगी शाळा चांगली? पाहा काय सांगतोय अहवाल title=
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली : सरकारी शाळा सोडून अनेक पालक खासगी शाळांकडे वळत आहेत. मात्र कोरोनामध्ये वाढत्या फीमुळे पुन्हा एकदा पालक सरकारी शाळांकडे वळत आहेत. खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळांमध्ये शैक्षणिक सुविधा चांगल्या आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. यासंदर्भातील एक अहवाल समोर आला आहे. हा अहवाल पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की खासगीपेक्षा सरकारी शाळाच चांगल्या आहेत. 

हल्ली प्रत्येक जण खासगी शाळेत घालण्यासाठी धडपड करतात. अॅडमिशन मिळवण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या पालकांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. काही दिवसांपूर्वी खासगी आणि सरकारी शाळांबद्दल एक संशोधन करण्यात आलं.  खासगी शाळेत पाठवून मुलांची शैक्षणिक पातळी चांगली वाढेल असा अनेक पालकांचा समज असल्याचं समोर आलं. 

न्यू इंग्लंड युनिव्हर्सिटीमध्ये शैक्षणिक आणि मानसशास्त्रामध्ये पीएचडी करणाऱ्या लार्सन आणि अलेक्झांडर फोर्ब्स यांनी एक रिसर्च पेपर सादर केला. यामध्ये त्यांनी सरकारी आणि खासगी शाळांच्या फीची तुलना केली आहे. सरकारी शाळांमध्ये अनेक सवलती आणि फी देखील कमी असते. त्या तुलनेत खासगी शाळा जास्त महाग असतात. 

सरकारी आणि खासगी शाळांमध्ये शिकणारी मुलं ही एकमेकांपेक्षा वेगळी नसतात. त्यांची बुद्धीमत्ता सारखीच असते. मात्र यामध्ये तफावत असते ती आर्थिक दृष्ट्या. कुटुंबाची पार्श्वभूमी ही देखील यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे. त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात असंही या अहवालात म्हटलं आहे. 

खासगी शाळांमध्ये मिळणारं शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा निकष मानला जातो. त्यामुळे प्रत्येकवेळी फक्त खासगी शाळेतील शिक्षण चांगलं असतं असेही म्हणणं कदाचित चुकीचं ठरू शकतं. OECD च्या अहवालानुसार टेक्नोलॉजीच्या बाबतील खासगी शाळांमध्ये शिकणारी मुलं ही सरकारी शाळेतील मुलांपेक्षा पुढे होती. मात्र आर्थिक आणि सामाजिक स्थिती लक्षात घेता सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांचे गुण खासगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत जास्त होते. 

खासगी शाळांमध्ये उत्तम तंत्रज्ञान मिळतं, सोयीसुविधा मिळतात असा एक समज लोकांमध्ये निर्माण करण्यात आला आहे. मात्र आता त्याच जोडीला सरकारी शाळांमध्ये देखील तेवढेच बदल होत असल्याचं दिसत आहे. हा संपूर्ण अभ्यास ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आला. हे निकष तिथल्या देशात तरी लागू होतात.  

खासगी शाळांमध्ये मुलांना शिकवल्यानंतर ते लवकर आपली स्वप्न पूर्ण होतील. अशा प्रकारची एक धारणा आहे मात्र असं ठोस सांगणारे कोणतीही कागदपत्र नाहीत मात्र हे सगळं अभ्यास आणि अहवालातून समोर आलं आहे.