चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती बाहुबली, असे विद्यार्थ्याने उत्तर लिहिले; शिक्षकाने दिले पूर्ण गुण, का?

बऱ्याच वेळा आपल्याला सोशल मीडियावर अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, ज्या पाहून आणि जाणून घेतल्यावर आपल्याला खूप आश्चर्य वाटते. आणि विचार करत राहतो की हे कसे होऊ शकते?  

Updated: Aug 6, 2021, 11:16 AM IST
चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती बाहुबली, असे विद्यार्थ्याने उत्तर लिहिले; शिक्षकाने दिले पूर्ण गुण, का? title=

मुंबई : बऱ्याच वेळा आपल्याला सोशल मीडियावर अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, ज्या पाहून आणि जाणून घेतल्यावर आपल्याला खूप आश्चर्य वाटते. आणि विचार करत राहतो की हे कसे होऊ शकते? अनेकदा असे काही व्हिडिओ आणि फोटो देखील व्हायरल होतात, जे पाहून आम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. अशावेळी, परीक्षेला बसलेल्या मुलाने दिलेले उत्तर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. उत्तर कळल्यानंतर लोक त्या मुलाच्या बुद्धीचे कौतुक करत आहेत.

वास्तविक, एक परीक्षेचा पेपर (जुना) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक प्रश्न लिहिलेला आहे, चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण होती? यावर मुलाने उत्तरादाखल लिहिले - बाहुबली. (Baahubali) विशेष गोष्ट म्हणजे या उत्तरासाठी शिक्षकाने मुलाला पूर्ण गुण (Marks) दिलेत. आपण विचार करत असाल की हे किती मजेदार आहे. पण हा अजिबात विनोद नाही, पण हे खरे आहे.

उत्तरादाखल बाहुबली लिहिण्यासाठी शिक्षकाने त्याला पूर्ण मार्क का दिले, ते आम्ही तुम्हाला सांगू. उलट, शिक्षकाने त्याला अपयशी ठरवले पाहिजे. कारण चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्‍ट्राँग (Neil Armstrong) होती. शिक्षकाने मुलाला गुण दिले कारण, मुलाने खूप विचार करून उत्तर बाहुबली लिहिले होते.

हा पेपर आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यासोबत त्यानी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, #बॉलिवूड फॅनचे मत. व्हायरल होणाऱ्या या कॉपी पेपरमध्ये तुम्ही पाहू शकता की पहिला प्रश्न लिहिलेला आहे, चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण होती? उत्तरात लिहिले आहे - बाहुबली. त्याखाली लिहिले आहे-बहू-आर्म, बाली-स्ट्राँग. हे पाहून तुम्हाला समजले असेल की मुलाने बाहुबली, असे उत्तर का दिले आणि शिक्षकाने त्याला पूर्ण गुण का दिले.