Gujarat Exit Poll 2022 : गुजरातमध्ये भाजपचं सलग चौथ्यांदा कमळ; आप-काँग्रेसचा फ्लॉप शो!

Gujarat Election Exit Poll Result:  BARC ने ZEE NEWS साठी हा एक्झिट पोल केला आहे, ज्यामध्ये गुजरातच्या 182 विधानसभा मतदारसंघातील लोकांना प्रश्न विचारण्यात आले आहेत. हे निवडणूक निकालाआधीचे अंदाज आहेत, निवडणुकीचे निकाल नाहीत.

Updated: Dec 5, 2022, 09:00 PM IST
Gujarat Exit Poll 2022 : गुजरातमध्ये भाजपचं सलग चौथ्यांदा कमळ; आप-काँग्रेसचा फ्लॉप शो!
Gujarat Assembly Election

Gujarat Assembly Election Exit Poll Result: आगामी लोकसभा निवडणुकीपुर्वी गुजरात विधानसभा निवडणुकीला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. गुजरात विधानसभा निवडणूक 2022 च्या (Gujarat Assembly Election 2022) दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. गुजरातमध्ये भाजपने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत सातव्यांदा सरकार स्थापन करणार असल्याचं चित्र समोर येत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत (Gujarat Assembly Election 2017) दोन्ही टप्प्यात 182 जागांपैकी भारतीय जनता पक्षाला 99 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या. याशिवाय 6 जागा इतर उमेदवारांच्या वाट्याला गेल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा गुजरातच्या जनतेने भाजपवर विश्वास ठेवल्याचं पहायला मिळतंय.

गुजरात विधानसभा निवडणुकीचा Exit Poll Result

गुजरातमध्ये कोणाच्या किती जागा मिळणार?

भाजपला 110-125 जागा
काँग्रेसला 45-60 जागा
आपला 1-5 जागा
अपक्षांना 0-4 जागा

मध्य गुजरातमध्ये किती जागा?

भाजपला 43 जागा
काँग्रेसला 14 जागा
आपसाठी 1 सीट
अपक्षांना 3 जागा

दक्षिण गुजरातच्या 35 जागांपैकी कोणाच्या किती जागा आहेत?

भाजपला 24 जागा
काँग्रेसला 6 जागा
आपला 4 जागा
इतरांसाठी 1 जागा

आणखी वाचा - Himachal Pradesh Exit Poll: भाजप की काँग्रेस? हिमाचलमध्ये कोण मारणार बाजी? आपचा सुपडासाफ!

दरम्यान, गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात एकूण 833 उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात गुजरातमधील 93 जागांवर मतदान (Gujarat Election 2022) होत आहे. यावेळी गुजरात विधानसभा निवडणुकीतील अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यात बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, सरकारी नोकऱ्या, महागाई, शेतकरी, ओबीसी आरक्षण, अल्पसंख्याक, मोरबी घटना, अंमली पदार्थांची तस्करी, भटके प्राणी आणि ध्रुवीकरण यांचा मुद्द्यांचा समावेश आहे.