घड्याळ्यात 10 वाजून 10 मिनिटे का दाखवलेली असतात? जाणून घ्या या मागचं कारण

घड्याळ आपल्या रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. घड्याळाशिवाय दिवसाचं नियोजन करणं कठीण आहे.

Updated: Jul 18, 2022, 06:45 PM IST
घड्याळ्यात 10 वाजून 10 मिनिटे का दाखवलेली असतात? जाणून घ्या या मागचं कारण title=

Clock Photo: घड्याळ आपल्या रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. घड्याळाशिवाय दिवसाचं नियोजन करणं कठीण आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्व वेळा ठरलेला असतात. आयुष्य कसं अगदी घड्याळ्याच्या काट्यावर धावत असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत वेळेचं खूपच महत्त्व आहे. एखादी लोकल ट्रेन दोन मिनिटं जरी उशिरा आली तरी दिवसाचं गणित बिघडून जातं. त्यामुळे घड्याळ्याच्या काट्यावर आपलं जीवन चालतं असं बोलायला हरकत नाही. पण या घड्याळ्याची एक बाब तुमच्या निदर्शनास आली आहे का? नसेल तर गुगलवर लगेच घड्याळ्याचा फोटो सर्च करा. तुम्हाला त्यात एक कॉमन गोष्ट दिसेल, ती म्हणजे प्रत्येक घडाळ्यात 10 वाजून 10 मिनिटं झालेली दिसतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? या सर्व फोटोमध्ये 10 वाजून 10 मिनिटं ठेवण्यामागचं कारण काय असेल? तुम्हाला आज याबाबत सांगणार आहोत.

घड्याळ्यातील 10 वाजून 10 मिनिटाबाबत काही काल्पनिक कथा रंगवल्या जातात. अब्राहम लिंकन यांचा मृत्यू या वेळेला झाल्याचं सांगण्यात येतं. मात्र अब्राहम लिंकन यांचा मृत्यू 10 वाजून 15 मिनिटांनी झाला होता. तर काही जण हिरोशिमा, नागासाकीवर या वेळेला हल्ला करण्यात आल्याचं सांगतात. मात्र यातही काही तथ्य नाही. मग 10 वाजून 10 मिनिटं दाखवण्यामागचा नेमका हेतू काय? याच संदर्भ वेळेशी नसून व्ही आकाराच्या शेपशी आहे. घड्याळ्यात 10 वाजून 10 मिनिटे ही वेळ व्ही शेप दर्शवते आणि V हे चिन्ह विजय दाखवते. 

काही घड्याळ कंपन्यांच्या मते, 10 वाजून 10 मिनिटावर असलेले काटे 'स्माईल'सारखे दिसतात. कंपनीचं प्रोडक्ट ग्राहकांना हसताना दिसावं, असा यामागचा उद्देश आहे. तसेच यामुळे कंपनीचं ट्रेडमार्क जे 12 या आकड्याखाली दिलं असतं तेही अधोरेखित होतं.