Why Are Aircraft Painted White: आकाशात उडणाऱ्या विमानाबाबत कायमच लहान मुलांना आकर्षण असतं. आपल्यापैकी काही जणांनी अनेकदा विमान प्रवास केलाही असेल. पण काही जणांसाठी विमानप्रवास हे दिवास्वप्न आहे. त्यामुळे विमानाबाबत कायमच कुतुहूल पाहायला मिळतं. पण विमानाबाबत एक बाब विचार करण्यासारखी आहे. विमानांचा रंग पांढरा का असतो? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. ठरावीक विमानं सोडली तर बहुतेक विमाने पांढर्या रंगाची असतात. जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला त्यामागील कारण सांगतो. प्रत्येक एअरलाइन कंपनी वेगवेगळ्या रंगांमध्ये विमानाचे ब्रँडिंग आणि टॅगलाइनसह भिन्न गोष्टी करू शकते, परंतु ते जहाजाचा मूळ रंग पांढरा असतो.
या कारणांमुळे विमानाचा रंग पांढरा ठेवतात
1. विमानाचा रंग पांढरा ठेवण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पांढरा रंग सूर्यप्रकाश प्रतिबिंबित करतो. त्यामुळे विमानावर पडल्यानंतर सूर्यप्रकाश रिफ्लेक्ट होतो. अशा स्थितीत निळ्या आणि लख्ख आकाशातही विमान सहज दिसतं. याव्यतिरिक्त, सूर्यप्रकाशाच्या परावर्तनामुळे विमानाचा पृष्ठभाग गरम होत नाही. त्यामुळे विमानातील प्रवाशांना उष्णता जाणवत नाही. इतर रंग सूर्यप्रकाश शोषून घेतात, त्यामुळे विमानातील प्रवाशांना अस्वस्थ वाटू शकते.
2. विमानाने ठरावीक उंचीवर उड्डाण केल्यानंतर अनेक प्रकारच्या वातावरणीय परिस्थितींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत विमानाचा रंग उडू नये, म्हणून विमानाचा रंग पांढरा ठेवला जातो. पांढऱ्या रंगामुळे विमानाचे सौंदर्य अबाधित राहते.
3. विमानाच्या पांढऱ्या रंगामुळे त्यावर कोणत्याही प्रकारचं डॅमेज किंवा क्रॅक इत्यादी सहज दिसून येते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही खूप फायदेशीर आहे.
4. टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळी पक्ष्यांची विमानाशी टक्कर होते तसेच अनेकदा अपघातही घडतात. अशा परिस्थितीत हे अपघात रोखण्यासाठी विमान कंपन्या विमानाचा रंग पांढऱ्या रंगाने रंगवतात. विमानाच्या पांढर्या रंगामुळे त्याची दृश्यमानता चांगली असते, त्यामुळे पक्ष्यांना दूरवरून विमानाची कल्पना येते आणि मोठा अपघात टळतो.