close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

चीनने मसूद अजहरला पाठीशी घालण्यामागे 'पाक'सोबतची मैत्री की वेगळीच भीती ?

 चीनच्या या निेर्णयामागे पाकिस्तानसोबतची मैत्री हे कारण आहे की चीनला वेगळीच भिती वाटत आहे याची चर्चा होत आहे. 

Updated: Mar 14, 2019, 03:02 PM IST
चीनने मसूद अजहरला पाठीशी घालण्यामागे 'पाक'सोबतची मैत्री की वेगळीच भीती ?

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघाच्या समितीपुढे मसूद अजहरला जागितक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला चीनने चौथ्यांदा विरोध केला आहे. आपल्या वीटो अधिकाराचा वापर करुन चीन यामध्ये आडकाठी टाकत आहे. भारताने खूप सारे पुरावे देऊनही चीन मसूद अजहरला पाठीशी का घालत आहे ? हा प्रश्न उपस्थित राहतोच. चीनच्या या निेर्णयामागे पाकिस्तानसोबतची मैत्री हे कारण आहे की चीनला वेगळीच भिती वाटत आहे याची चर्चा होत आहे. 

फ्रान्स, अमेरिका व ब्रिटन या देशांच्या साथीने 'जैश'चा म्होरक्या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा संयुक्त प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीपुढे मांडला होता. पुलवामाचा हल्ला अत्यंत भीषण असल्यामुळे अनेक देशांनी तीव्र शब्दांत याचा निषेध केला होता. यामध्येही चीनचाही समावेश होता. त्यावेळी चीनने दहशतवाद्यांना शासन करण्यासाठी शक्य त्या सर्व मार्गांचा वापर करू, असेही म्हटले होते. त्यामुळे किमान आतातरी चीन मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना साथ देईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली. यामागचे कारण म्हणजे चीन जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना घाबरत असावे किंवा चीनच्या उंगीहार प्रांतात दहशतवाद वाढू नये यासाठी प्रयत्न असल्याचे तर्क समोर येत आहेत. 

या दोन्ही प्रश्नांचे उत्तर आपल्याला 'जैश' संघटना आणि लष्करापर्यंत घेऊन जातात. चीनचा सीपीईसी प्रकल्प गिलगित-बाल्टीस्तान क्षेत्रामधून जात नाही. तर हा प्रकल्प पाक अधिकृत काश्मीर आणि पाकिस्तानच्या मानसेहरा जिल्ह्याच्या अशा भांगातून जातो जिथे खैबर पख्तूनख्वा भाग येतो. खैबर पख्तूनख्वा हे तेच राज्य आहे जिथल्या बालाकोटमध्ये भारतीय वायुसेनेच्या हल्ला चढवत दहशतवाद्यांवर हल्ला चढवला. याच विभागातून चीनचा प्रकल्प पुढे जातो. 

जर आपण मसूदला वाचवले नाही तर आपल्याला या प्रकल्पावर काम करणाऱ्या चीनच्या 12 हजारहून अधिक नागरिकांवर हल्ला होऊ शकतो अशी एक भीती आहे. यामुळेच कदाचित चीन भारत आणि इतर देशांना सहकार्य करत नाही. 

Image result for china and masood zee news

मानसेहरा सहीत अनेक विभागात दहशतवाद्यांचे कॅंप चालतात. यातील बालाकोट कॅंप आता नष्ट झाला आहे. बालाकोट जवळील राष्ट्रीय महामार्ग 15 जवळ चीनने सीपीईसी प्रकल्पासाठी जमिन खरेदी केली आहे. जैशचे दहशतवादी च्यांच्या इंजिनिअर्सना पळवून नेऊ नयेत अशी चीनला भिती असावी असेही म्हटले जात आहे. चीनच्या सीपीईसी प्रकल्पा अंतर्गत पाक अधिकृत काश्मीरमधील अनेक जागांवर प्रकल्प बनत आहेत. या दरम्यान अशी अनेक ठिकाणे येतात जिथे पाकिस्तान एजंसी आयएसआयने दहशवादी गडास प्रोत्साहन दिले आहे. पाकिस्तान अधिकृत काश्मीर (पीओके) मध्ये 1,100 मेगावॉटचा कोहरा हायड्रो पॉवर प्रोजेक्ट चीन बनवत आहे. पाकिस्तानला जर चीनने खुश ठेवले नाही तर मसूद अजहर आणि लष्कर ए तोयबा त्यांचे प्रोजेक्ट नष्ट करेल अशी चीनला भीती आहे. यामुळे प्रकल्पाचे मोठे नुकसान होऊ शकते हे चीनला माहिती आहे. 

Image result for china and masood zee news

पुलवामामध्ये हल्ला करणाऱ्या मसूद ला चीन पाठीशी घालत आहे आणि आपल्या देशात दहशतवाद घुसू नये म्हणून पाकिस्तानमध्ये घुसत असल्याची दुहेरी खेळी सध्या चीन करताना दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे.