१.३० आणि २.३० ला 'दीड' किंवा 'अडीच' असं का म्हणतात? या मागील कारण मजेशीर

लहानपणापासून बोलतो खरं पण त्यामागील कारण काय? 

Updated: Jan 6, 2022, 07:03 AM IST
१.३० आणि २.३० ला 'दीड' किंवा 'अडीच' असं का म्हणतात? या मागील कारण मजेशीर   title=

मुंबई : लहानपणीच मुलांना घड्याळाच आकर्षण असतं. त्यामुळे खूप कमी वयात घड्याळातील आकडे ओळखले जातात. तेव्हापासूनच प्रत्येकाला प्रश्न असतो. आपण ३.३० ला साडे तीन आणि ४.३० ला साडे चार असं संबोधतो. पण मग १.३० ला दीड आणि २.३० ला अडीच का म्हटलं जात नाही. जर कुणी याला साडे एक किंवा साडे दोन बोलले तर आपण त्याला हसतो. पण दीड आणि अडीच का म्हटलं जातं याच कारण कुणालाच माहित नाही. 

भारतीय अंकानुसार संबोधलं जातं.

हे शब्द भारतीय अंकाची देण आहे. याचमुळे लहानपणी वेळ सांगताना चूक व्हायची. भारतीय अंकात 'साडे' (Saadhe), 'पावणे' (Paune), 'सव्वा' (Sava) और 'अडीच' (Dhai) शब्द आहेत. याचा वापर घड्याळातील वेळ सांगण्यासाठी केला जातो. हे सगळे शब्द अपूर्णांकात सांगण्यासाठी देखील केला जातो. 

रिपोर्टनुसार, यावेळी मुलांना २,३,४,५ चे पाढे पांढातर करायला सांगितलं जातं. मात्र आपल्या आधीच्या पिढीला 'चतुर्थांश','सव्वा', 'पाऊणे', 'दीड' आणि 'अडीच' चे पाढे शिकवले गेले. 

अपूर्णांक संख्या म्हणजे काय?

अपूर्णांक म्हणजे पूर्ण संख्येचा भाग किंवा भाग वर्णन करणारी संख्या. म्हणजेच दोन पूर्ण संख्यांचा भागांक हा अपूर्णांक असतो. 3 प्रमाणे 2 मध्ये विभागले जे दीड वर आले. वेगवेगळ्या देशांमध्ये अपूर्णांक लिहिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामुळे भारताची अपूर्णांक संख्या बरीच प्रगत मानली जाते.

यामागचं कारण काय?

प्रत्येकासाठी वेळ खूप महत्वाचा आहे, म्हणून हे शब्द फक्त वेळ वाचवण्यासाठी वापरले जातात. उदाहरणार्थ, 'साडे एक' किंवा 'साडे दोन' म्हणण्यापेक्षा 'दीड' किंवा 'अडीच' म्हणणे सोपे आहे. लहान शब्दात सर्व काही स्पष्ट आहे. उदाहरणार्थ, जेव्हा घड्याळात 4:45 वाजतात तेव्हा त्याला कमी शब्दात, 'पावणे पाच' म्हटले जाते. 

ज्योतिष शास्त्रातही होतो वापर 

अपूर्णांक संख्या ज्योतिषशास्त्रात देखील वापरली जाते. भारतात वजन आणि वेळ अपूर्णांकात मोजली जाते. हे केवळ वेळेबरोबरच नाही, तर पैसा आणि पैसाही आहे. 150 ला आपण दीडशे आणि 250 ला अडीचशे म्हणतो. त्याचप्रमाणे दीड किलो, अडीच किलो… दीड मीटर, अडीच मीटर… दीड लिटर, अडीच लिटर सारख्या शब्दांचा रोजच्या व्यवहारात उपयोग होतो.