Pen Caps Have Holes Know Reason Behind Of It: आपण रोज वापरत असलेल्या वस्तूबाबत आपल्याला हवी तशी माहिती नसते. कारण त्या वस्तू रोज वापरत असल्याने त्याकडे लक्ष जात नाही. आता बघा ना, तुम्ही रोज पेन वापरता. आता या पेनचा (Pen) उपयोग फक्त लिहिण्यासाठी होतो. म्हणून आपण पेन आपल्याकडे ठेवतो. तुमच्याकडे असलेल्या पेनचं तुम्ही कधी निरीक्षण केलं आहे का? नसेल तर बघा. पेनाच्या टोपणाकडे (Pen Cap Hole) एकदा लक्षपूर्वक बघा, तुम्हाला त्यावर तुम्हाला एक छिद्र दिसेल. हे छिद्र पेनमधील शाईशी संबंधित आहे असं तुम्हाला वाटेल, पण तसं नाही. पेनच्या टोपणाला छिद्र देण्याची कल्पना एका सवयीमुळे समोर आली आहे. हो तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे. चला तर मग जाणून घेऊयात त्या मागचं खरं कारण काय आहे?
आपल्यापैकी काही जणांनी पेन तोंडात घालण्याची एक सवय असते. त्यापैकी अनेक जण टोपण दाताने चावतात. अशात ते टोपण घशात जाण्याची दाट शक्यता असते. या सवयीमुळेच पेनच्या कॅपवर छिद्र दिलेलं असतं. टोपणावरील छिद्र तुम्हाला मृत्यूच्या दाढेतून परत आणू शकते. वास्तविक, पेनच्या कॅपवरील छिद्राचा उद्देश तुम्हाला गुदमरण्यापासून वाचवण्याच्या हेतूने तयार केलं गेलं आहे. पेनच्या कॅपवरील छिद्र तुमच्या सुरक्षिततेसाठी तयार केले आहे.
पेनचं टोपण चुकून कोणी गिळले तर श्वास कोंडू नये हा मुख्य उद्देश आहे. या छिद्रामुळे श्वास घेण्यास अडचण येणार अशी कल्पना आहे. जर चुकून कोणी टोपण गिळलं तरी छिद्रातून श्वास घेता येईल. तसेच गळ्यात टोपण अडकलेल्या व्यक्तीला तात्काळ डॉक्टरकडे नेता येईल.