वडोदरा : अनैसर्गिक लैंगिक संबंध हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र तरीही काही व्यक्ती आपल्या पार्टनरची फसवणूक करत अशाप्रकारचे अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित करत असतात. आता अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये पती पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित करत होता. मात्र ज्यावेळेस पत्नीला या घटनेची माहिती मिळाली, त्यावेळेस तिच्या पायाखालचीच जमीन सरकली होती. नेमकं या घटनेत काय घडलंय ते जाणून घेऊयात.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शीतलने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, तिच्या पहिल्या पतीचा अपघाती मृत्यू झाला होता. या पतीपासुन तिला 14 वर्षाची मुलगी होती. आता त्या दोघी एकट्याच पडल्या होत्या. त्यामुळे शितलने दुसर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
शितलने दुसऱ्यांदा लग्न करण्यासाठी मॅट्रिमोनियल वेबसाइटवर नोंदणी केली होती. या नोंदणीनंतर ती विराज वर्धन नामक एका व्यक्तीला भेटली. या भेटीनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय़ घेतला. 2014 ला कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांनी औपचारिकपणे लग्न केले. या लग्नांतर दोघेही काश्मीरला हनीमुनलाही गेले.
महिलेने पोलिसांनी दिलेल्या माहितीत सांगितले की, दोघेही हनीमूनसाठी काश्मीरलाही गेले. मात्र, त्याने शारिरीक संबंध ठेवले नाहीत, तसेच अनेक दिवस तो शारिरीक संबंध ठेवण्यासाठी बहाणा करत राहिला. तब्बल आठ वर्ष दोघे एकमेकांसोबत एकाच बेडवर होते, मात्र त्याने कधीही शारिरीक संबंध ठेवले नाही. मात्र जेव्हा महिलेने त्याच्यावर दबाव टाकला. तेव्हा पतीन सर्व बाब सांगितली.
पतीचा धक्कादायक खुलासा
पतीने काही वर्षांपूर्वी रशियामध्ये त्याच्यासोबत झालेल्या एका अपघातामुळे तो लैंगिक संबंध ठेवू शकला नसल्याचा दावा केला. तसेच किरकोळ शस्त्रक्रियेनंतर तो पूर्णपणे बरा होईल, असे आश्वासन देखील दिले. यानंतर जानेवारी 2020 मध्ये, पतीने महिलेला लठ्ठपणाची शस्त्रक्रिया करायची अशी माहिती दिली. यानंतर पतीने त्याच्यावर लिंग पुनर्नियुक्तीची शस्त्रक्रिया (gender-reassignment surgery) झाली असल्याचा धक्कादायक खुलासा केला.
पती 'तो' नव्हता 'ती' होती
याचा अर्थ असा होतो की, महिलेचा पती हा पुरुष नसून तो स्त्री होता. त्याने लिंग पुनर्नियुक्तीची शस्त्रक्रिया (gender-reassignment surgery) करून तो पुरुष बनला होता. त्यानंतर त्याने महिलेशी लग्न केले होते. यामध्ये साधारण 8 वर्ष महिलेला ती एका पुरुषाच्या वेशात एका महिलेसोबत राहत असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला. हि घटना एकूण महिलेच्या पायाखालचीच जमीन सरकली होती.
पुरुषी वेषभूषा साकाणाऱ्या महिलेच्या या घटनेचा भांडाफोड होताच, पत्नीने पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र पतीने महिलेसोबत "अनैसर्गिक लैंगिक संबंध" सुरू केले आणि जर तिने याबाबत कोणालाही सांगितले तर तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली.
या घटनेनंतर महिलेने विराज वर्धन (पूर्वी विजया) यांच्यावर "अनैसर्गिक लैंगिक संबंध" आणि फसवणूक केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. या तक्रारीत कुटुंबातील सदस्यांची नावेही नोंदवली आहेत.गोत्री पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पती विराज वर्धन (पूर्वी विजया) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गोत्रीचे पोलीस निरीक्षक एमके गुर्जर यांनी सांगितले की, आरोपी हा दिल्लीचा रहिवासी असून त्याला वडोदरा येथे आणण्यात आले असून तो सध्या अटकेत आहेत. गुजरातमध्ये ही घटना घडलीय. या घटनेने संपुर्ण राज्य हादरलंय.