वाट माझी बघतोय रिक्षावाला...; Auto वाल्यावर भाळली करोड'पती'ची पत्नी

प्रेम आंधळ असतं.. 

Updated: Oct 25, 2021, 03:05 PM IST
वाट माझी बघतोय रिक्षावाला...; Auto वाल्यावर भाळली करोड'पती'ची पत्नी

मुंबई : प्रेम हे आंधळ असतं... प्रेमाला वयाचं, श्रीमंतीचं कसलंच बंधन नसतं. असंच काहीस मध्य प्रदेशमधील इंदौरमध्ये घडलं आहे. एका करोडपती व्यक्तीची पत्नी तब्बल 13 वर्षांनी लहान असलेल्या ऑटो रिक्षा चालकासह पळून गेली. महिला एवढ्यावरच थांबली नाही तर तिने आपल्या करोडपती नवऱ्याचे 47 लाख घरातून चोरले. 

रिक्षावाल्यावर करोडपतीच्या पत्नीचं हृदय 

फ्री प्रेस जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार ही घटना इंदूरच्या खजराना परिसरात घडली. पत्नी बेपत्ता झाल्याची आणि घरातून 47 लाख रुपये गायब झाल्याची तक्रार महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात दिली आहे.

आरोपीच्या शोधात आहेत पोलीस 

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कोट्याधीशाची पत्नी आणि रिक्षाचालकाचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक अनेकदा महिलेला तिच्या घरी सोडत असे. आरोपी महिला १३ ऑक्टोबरपासून बेपत्ता आहे. जेव्हा पत्नी रात्रीपर्यंत घरी आली नाही आणि तिची कोणतीही बातमी आली नाही, तेव्हा पतीने पत्नीची हरवल्याची तक्रार दाखल केली. 

पत्नीसोबत घरातून 47 लाख गायब 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती करोडो रुपयांच्या जमिनीचा मालक आहे. त्याने घराच्या कपाटात 47 लाख रुपये ठेवले होते. 47 लाखासह त्याची पत्नीही घरातून गायब झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेसोबत पळून गेलेल्या रिक्षाचालकाचे नाव इम्रान असून तो ३२ वर्षांचा आहे. इम्रानच्या मित्राच्या घरातून पोलिसांनी 33 लाख रुपये रोख जप्त केले आहेत. मात्र, महिला आणि रिक्षाचालकाला पकडण्यात अद्याप यश आलेले नाही.

आरोपी महिला आणि रिक्षाचालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस खंडवा, जावरा, उज्जैन आणि रतलाम येथे सतत छापे घालत आहेत. या चार शहरांमध्ये आरोपींचे ठिकाण सापडले आहे. दोन्ही मोबाईलचे लोकेशनही पोलीस ट्रेस करत आहेत.