Trending News Today: महिलेला दिवस गेले नववा महिना लागला तरीदेखील तिला पत्ताच नाही. पोट दुखतंय म्हणून महिला रुग्णालयात गेली. डॉक्टरांनी तपासल्यानंतर ती गर्भवती असल्याचे कळले. हे एकल्यावर महिलेच्या पायाखालची जमिनच हादरली आहे. कारण गेल्या 9 महिन्यांपासून तिला ना कधी लक्षणे जाणवली ना कधी अस्वस्थापणा जाणवला. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.
महिलेच्या पोटात तीव्र वेदना होत होती. डॉक्टरांनी तापसणी केल्यानंतर तिला नववा महिना सुरू असल्याचे कळले तसंच तिला प्रसूती वेदना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान येथे ही घटना घडली आहे. डॉक्टरांनी हे सांगताच महिला आणि तिच्या कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिला गर्भावस्थेच्या कोणतेच लक्षणे नव्हती. प्रेग्नेंसी किटमध्येही काहीच रिझल्ट आला नव्हता. त्यामुळं यावर विश्वास ठेवणे कठिण जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून तिच्या पोटाला सूज आल्यासारखे वाटत होते. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांनी अॅसिडिटी असल्याचे सांगितले. कुटुंबीयांनीदेखील अॅसिडिटीमुळं सूज आल्याचे म्हटलं आहे. तसंच, पोटाचा ट्युमर झाल्याची भितीने तेदेखील टेस्ट केले गेले. मात्र,ट्युमरच्या टेस्टही निगेटिव्ह आल्या. त्यानंतर कुटुंबीयांनी महिलेचे पोट गॅस आणि अॅसिडिटीमुळं सुजले आहे, यावर विश्वास ठेवलं.
शुक्रवारी महिलेच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या. तेव्हा तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेव्हा महिला गर्भवती असून तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या आहेत हे ऐकून कुटुंबीयांनाही धक्का बसला. डॉक्टरांनी लगेचच तिला रुग्णालयात दाखल करुन तिच्यावर उपचार सुरू केले. त्यानंतर महिलेने एका मुलाला जन्म दिला. बाळ आणि आई दोघंही सुखरुप आहेत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला गेल्या 9 महिन्यांपासून गर्भवती होती पण तिला याबाबत काही माहितीच नव्हती. तिला प्रत्येक महिन्याला मासिक पाळीही येत होती. गर्भवती असल्याचे कोणतेही लक्षणे तिला दिसत नव्हते. 9 महिन्यांनतर महिला गर्भवती असल्याचे तिला कळले. अशा प्रकारच्या घटनेला वैज्ञानिक भाषेत क्रिप्टो प्रेग्नेंसी म्हणतात.
अशावेळी रुग्णाला गर्भवस्थेतील कोणतेच लक्षणे दिसत नाहीत. मात्र, 20 आठवड्यानंतर प्रग्नेंसीबद्दल कळते. सध्या अशाप्रकारच्या केसेस खूप कमी पाहायला मिळतात. पण सध्या आई आणि बाळ दोघंही निरोगी असून सुखरुप आहेत. महिलेला दीड वर्षांचा एक मुलगा आहे. आता पुन्हा घरात गोंडस बाळ आल्यानतंर कुटुंबीयही खुश आहेत.