मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसांत घरात थंडावा मिळण्यासाठी तुम्हीही घरात एअर कंडिशनर लावला असेल तर नक्कीच वाढत्या वीज बिलाची काळजी तुम्हालाही लागलेली असेल.
परंतु, काही सोप्या टीप्सचा अवलंब केला तर तुम्हाला वीजेचं बिल नियंत्रणात ठेवता येऊ शकतं.
- सायंकाळची हवा दुपारच्या तुलनेत थंड असते. या हवेचा पुरेपूर वापर करा... सायंकाळच्या वेळी एसी बंद ठेवा.
- दिवसभर आणि रात्रभर एसी सुरू ठेवण्याऐवजी रात्री थोड्यावेळ एसी सुरू करा. त्यानंतर रुममधली हवा थंड झाली की मग एसी बंद करून पंख्याचा वापरही तुम्ही करू शकाल.
- दिवसा घरात येणाऱ्या उन्हामुळे घरातली जमीन आणि भिंती तापतात... आणि घरातली उष्णता आणखीन वाढते. त्यामुळे गडद रंगाचे पडदे लावून तुम्ही घरात येणारं ऊन रोखू शकता. त्यामुळेही एसी लावल्यानंतर घर थंड करण्यासाठी जास्त वीजेचा वापर होणार नाही.
- गरज नसेल तेव्हा घरातील विजेची उपकरणं म्हणजे, ट्युबलाईट, टीव्ही, मायक्रोवेव्ह, कम्प्युटर बंद ठेवा. या उपकरणांमुळेही घरातली उष्णता वाढते.
- गेल्या वर्षी उन्हाळा संपल्यानंतर तुम्हीही एसीचा वापर बंद केला असला तरी तो खुलाच सोडून दिला असेल... पण असं करू नका. कारण, तो खुला राहिल्यानं त्यात धूळ जमा होते... त्यामुळे त्याचे एअर फिल्टर खराब होण्याची शक्यता वाढते.... एअर फिल्टर खराब असेल तर त्यामुळे एसी हवा थंड करण्यासाठी जास्त वीज खेचतो. त्यामुळे, अगोदरच एक्सपर्टला बोलावून एसी साफ करून घ्या.