व्हिडिओ : जेव्हा राहुल गांधींच्या गळ्यात हवेतून उडत येऊन माळ पडली

तुमकुरूमध्ये गर्दीच्या रस्त्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी ४ एप्रिल रोजी एक रोड शो करत असतानाच एक धक्कादायक घटना घडलीय. या रोड शो दरम्यान जेव्हा ते रस्त्याच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या आपल्या समर्थकांना हात जोडून अभिवादन करत होते तेव्हा अचानक एक अशी घटना घडली की त्यामुळे राहुल गांधीच नव्हे तर त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेले एसपीजी जवानही हैरान झाले.

Updated: Apr 6, 2018, 07:42 PM IST
व्हिडिओ : जेव्हा राहुल गांधींच्या गळ्यात हवेतून उडत येऊन माळ पडली title=

बंगळुरू : तुमकुरूमध्ये गर्दीच्या रस्त्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी ४ एप्रिल रोजी एक रोड शो करत असतानाच एक धक्कादायक घटना घडलीय. या रोड शो दरम्यान जेव्हा ते रस्त्याच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या आपल्या समर्थकांना हात जोडून अभिवादन करत होते तेव्हा अचानक एक अशी घटना घडली की त्यामुळे राहुल गांधीच नव्हे तर त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेले एसपीजी जवानही हैरान झाले.

राहुल गांधी आपल्या शो दरम्यान  समर्थकांना अभिवादन करत असताना त्यांच्या एका समर्थकानं राहुल गांधींच्या दिशेनं एक फुलांची माळ फेकली... हा निशाणा इतका परफेक्ट होता की ही फुलांची माळ सरळ सरळ राहुल गांधी यांच्या गळ्यात जाऊन पडली. 

अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही काळ राहुल गांधीही स्तब्ध झाले. त्यानंतर त्यांनी ताबडतोब ही माळ आपल्या गळ्यातून काढली... आणि पुन्हा समर्थकांना अभिवादन करू लागले. या घटनेमुळे राहुल गांधीच नव्हे तर एसपीजी जवान आणि तिथं उपस्थित असणारे हजारो लोकही स्तब्ध झाले.

राहुल यांच्या सुरक्षारक्षकांनी ताबडतोब ही फुलांची माळ गाडीवरून हटवली. परंतु, हा व्हिडिओ मात्र काही वेळातच सोशल मीडियावर वायरल झालेला दिसला.