मोफत शिधा वाटपात योगी सरकारचा रेकॉर्ड, १ कोटी लोकांना धान्य

योगी सरकारचा शिधा देण्याच्या निर्णयात रेकॉर्ड 

Updated: Apr 1, 2020, 07:49 PM IST
मोफत शिधा वाटपात योगी सरकारचा रेकॉर्ड, १ कोटी लोकांना धान्य

लखनऊ : कोरोनाच्या संकटात कोणी सर्वसामान्य भरडला जाऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक उपाययोजना लागू करत आहेत. योगी सरकार यामध्ये अग्रस्थानी असून त्यांनी मोफत शिधा देण्याच्या निर्णयात रेकॉर्ड केला आहे. यामाध्यमातून एक लाख मॅट्रीक टन शिधा वाटप करण्यात आले. यामध्ये एक कोटी नागरिकांना मोफत ६८ हजार मॅट्रीक टन शिधा वाटप करण्यात आले. 

सरकारी आकड्यांनुसार आतापर्यंत १८ लाख शिधाकार्ड धारकांना शिधा मिळाला आहे. ३३ लाख परिवारातील ६० लाख जणांपर्यंत शिधा पोहोचला. कार्ड धारकांना ३० हजार ३६५ टन गहू आणि २१ हजार ७१५ टन तांदूळ वाटप करण्यात आले. तसेच ३,०१,२९८ मनरेगा कार्ड धारकांना खाद्यान्न वाटप झाले. शिधा वाटप करताना सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. 

लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६५९४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच काळाबाजार करणाऱ्या ५८ जणांविरोधात एफआयआर सहित ९४ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. युपीमध्ये ५२६१ चेकपोस्ट बनवले असून आतापर्यंत ३ कोटी ४३ लाखांची वसूली करण्यात आली आहे.