...नाहीतर LPG ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही

लक्षपूर्वक वाचा...

Updated: Oct 25, 2020, 11:26 AM IST
...नाहीतर LPG ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : घरगुती गॅस, LPG चा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुढील महिन्याच्या १ तारखेपासून तेल कंपन्यांकडून LPG गॅससाठी नवी डिलिव्हरी प्रक्रिया लागू करणार आहे. मुख्य म्हणजे या नव्या नियमाचं पालन न करणाऱ्या ग्राहकांना सिलेंडरची डिलिव्हरी घेण्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात. इतकच नव्हे, तर चुकीची माहिती दिल्यास, सिलेंडर न मिळण्याचं संकटही ग्राहकांवर ओढाऊ शकतं. 

OTP शिवाय मिळणार गॅस 

गॅस चोरी रोखण्यासाठी तेल कंपन्यांकडून ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी ही नवी पद्धत लागू करण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. याला Delivery Authentication Code (DAC) असं नाव देण्यात आलं आहे. ज्याअंतर्गत सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी १ नोव्हेंबरपासून OTP (One Time Password) चा वापर अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय सिलेंडर मिळू शकत नाही. 

कशी असेल ही प्रक्रिया ? 

सूत्रांच्या माहितीनुसार घरगुती गॅसची बुकींग करण्यावरच आता ही प्रक्रिया थांबणार नाही. बुकींगनंतर ग्राहकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवण्यात येईल. ज्यावेळी सिलेंडर डिलिव्हरी बॉय घरी येईल, तेव्हा त्या व्यक्तीसोबत ग्राहकांनी हा ओटीपी शेअर करणं अपेक्षित असेल. प्रथम DAC चा वापर हा १०० स्मार्ट शहरांमध्ये केला जाणार आहे. ज्यासाठी दोन शहरांमध्ये पायलट प्रोजेक्टही सुरु आहे. 

 

ग्राहकांचा मोबाईल नंबर अपडेट नसल्यास डिलीव्हरी पर्सन एका ऍपच्या माध्यमातून याला Real time अपडेटही करु शकणार आहे. म्हणजे डिलिव्हरीच्या वेळी त्या ऍपच्या सहाय्यानं तुम्ही मोबाईल नंबर डिलिव्हरी बॉयच्या सहाय्यानं अपडेट करु शकाल. ऍपच्या माध्यमातून  Real time  बेसिसवर मोबाईल क्रमांक अपडेट होईल. ज्यानंतर त्याच क्रमांकावर कोड जनरेट करण्याची सुविधाही देण्यात येईल.