कचरा वेचणाऱ्या तिघांकडून तरुणीवर बलात्कार

धारदार चाकूची भीती दाखवून एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.

Updated: Dec 28, 2018, 02:59 PM IST
कचरा वेचणाऱ्या तिघांकडून तरुणीवर बलात्कार title=

नवी दिल्ली: महिलांचा होणारा छळ कधी थांबेल? असा प्रश्न समाजातील अनेक लोकांना पडला आहे. नेहमी महिलांवर होण्याऱ्या अन्यायाची बातमी आपल्या कानावर पडत असते. उत्तराखंड येथे देखील असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कचरा गोळा करणाऱ्या तिघांनी धारदार चाकूची भीती दाखवून एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. उत्तराखंड येथील चमोली जिल्ह्यातील ही घटना आहे. बलात्कार करण्याऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन, त्यांना कोठडीत डांबले आहे. पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी पीडिता तिच्या मित्रासोबत बद्रिनाथ महामार्गाजवळील पंचकुला याठिकाणी फिरायला गेली होती. आरोपींनी पीडिता आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाला चाकूची भीती दाखवून थांबण्यास सांगितले.

 
पीडितेसोबत असलेल्या तरुणाकडून पैसे हिसकावून आरोपींनी तरुणीला रस्त्याजवळ असलेल्या झाडीत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच ही घटना कोणालाही सांगिल्यास ठार मारण्याची धमकीदेखील दिली. घरी पोहोचल्यावर तरुणीने तिच्यासोबत घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर कुटुंबासह तरुणी पोलिस ठाण्यात पोहोचली आणि तीन अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिस ठाण्याचे पोलिस प्रमुख चित्रगुप्त म्हणाले की, पीडितेसोबत असणाऱ्या तरुणाच्या मदतीने आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली.