मुसळधार पावसामुळे वसई मिठागारात 400 जण अडकले

या लोकांच्या मदतीसाठी चार बोटींमधून अत्यावश्यक वस्तू घेऊन जवान पोहचले आहेत.  

Updated: Jul 9, 2018, 04:10 PM IST
मुसळधार पावसामुळे वसई मिठागारात 400 जण अडकले title=

वसई: मुसळधार पावसामुळे वसई- विरार मिठागारातील लोकांना मोठा फटका बसलाय. मीठागरांमध्ये पाणी शिरल्यानं चारशे लोक अडकलेयत. त्यांच्या मदतीसाठी चार बोटींमधून अत्यावश्यक वस्तू घेऊन जवान पोहचले आहेत.  प्रशासन त्यांच्या मदतीला पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. पण जोरदार पावसामुळे पाण्याची पातळी सतत वाढते आहे. त्यामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत.  

मुंबई पुन्हा तुंबली
मुंबईत पावसाची उघडझाप सुरू असली तरी सखल भागातील पाणी ओसरलेले नाही. एल्फिस्टन ब्रीज ते परेल ब्रीज दरम्यानही पाणी साचल्यानं इथं वाहतूक कोंडी झालेली आहे. तुंबलेल्या पाण्यातूनच मुंबईकरांना वाट काढावी लागतेय. मुंबई तुंबण्याला सत्ताधारी जबाबदार असून शेकडो कोटी रूपये खर्च होऊनही पाण्याचा निचरा होत नसेल तर संबंधित अधिका-यांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी बीएमसीतील विरोधी पक्षनेत्यांनी केलीय. 

हिंदमातामध्ये ये रे माझ्या मागल्या...
दीडशे कोटी रुपये खर्चून बांधलेल्या ब्रिटानिया पंपिंग स्टेशनमुळं हिंदमाता येथे पाणी साचणार नसल्याचा महापालिकेचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला. पंपिग स्टेशन उभारुनही गेल्या दोन वर्षांपासून हीच परिस्थिती कायम आहे. त्यामुळे यंदाही हिंदमाता परिसराची पाणी साचण्यापासून सुटका झालेली नाही.