मुंबईत पारा 40शी पार; ठाण्यासह कोकणासाठी धोक्याचा इशारा, पुढचे 3 दिवस अतिशय महत्वाचे

weather department has issued a heat wave warning​ : मुंबईत पाऱ्याने जवळपास 40शी गाठली आहे. अशातच हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. 

Updated: Mar 15, 2022, 03:04 PM IST
मुंबईत पारा 40शी पार; ठाण्यासह कोकणासाठी धोक्याचा इशारा, पुढचे 3 दिवस अतिशय महत्वाचे  title=
PIC courtesy / ANI

मुंबई : weather department has issued a heat wave warning : मुंबईत पाऱ्याने जवळपास 40शी गाठली आहे. अशातच हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. पुढचे तीन दिवस मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत. कडक ऊन बाहेर असणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना सावधान राहा आणि काळजी घ्या. (IMD issues heat wave warning for Mumbai, Thane for next 3 days)

यंदा मार्च महिन्यातच मे महिन्याप्रमाणे कडक उन्हाचे चटके बसू लागले आहेत. त्यातच हवामान विभागाने मुंबई, ठाणे कोकणासाठी धोक्याचा इशारा जारी केला आहे. (weather department has issued a heat wave warning in Mumbai) पुढचे तीन दिवस उष्णतेची कडक लाट असेल. त्यामुळे उष्माघातासह अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. उन्हाळ्याने वर्दी दिली असून उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. उष्णतेची लाट आल्याने लहान मुलं, वृद्धांसह आधीच आजारी असलेल्यांनी सावध राहण्याची गरज आहे. यामुळे शरीरात पेटके येणे, थकवा येणे, उष्माघात यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. उष्माघात हा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे ग्रासतो.

हवामान (Weather) बदलले की आजारही आपले रूप बदलू लागतात आणि ऋतूच्या (season) बदलाबरोबर पाय पसरतात. असे काही आजार आहेत, जे उन्हाळ्यात (summer) लोकांवर अधिक वेगाने हल्ला करतात. जरी हे आजार सामान्य आहेत, परंतु वेळेवर उपचार (Treatment) न केल्यास ते घातक ठरू शकतात.

उष्माघाताची लक्षणे

उष्माघातात अन्नातून विषबाधा, ताप, पोटदुखी, उलट्या अशा समस्या सुरू होतात. थकवा येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होणे, उलटी होणे, अस्वस्थ वाटणे, रक्तदाब वाढणे ही उष्माघाताची काही लक्षणे आहेत.

काय घ्यावी काळजी?

थकवा आणि हीट स्ट्रोक अर्थात उष्माघातामधील मुख्य फरक असा की हीट स्ट्रोकमध्ये घाम येत नाही. एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास त्यांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. दरम्यानच्या काळात, त्याला थंड, सावलीच्या ठिकाणी झोपवावे.

ओल्या कपड्याने त्याचं शरीर पुसून घ्यावं. ज्याला त्रास होत असेल त्याच्या डोक्यावर साधे पाणी टाकत राहावे. शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. त्या व्यक्तीला ORS किंवा लिंबू सरबत द्या. त्या व्यक्तीला जवळच्या डॉक्टरकडे ताबडतोब न्या. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो.

घराबाहेर पडताना हलके, फिकट रंगाचे, सुटसुटीत सुती कपडे घाला. डोळे झाकण्यासाठी गॉगल्स, छत्री किंवा टोपी, बूट, चपला वापरा.

अल्कोहोल, चहा - कॉफी, कार्बोनेटेड ड्रिंक्स या सगळ्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होते. त्यामुळे ही पेयं टाळा. जर तुम्ही उघड्यावर उन्हात काम करणार असाल तर टोपी - छत्री वापरा, ओला नॅपकिन वापरून डोकं, मान, चेहरा आणि हात-पाय पुसा.