पोपट कुठे उडाला? सोमय्या यांचा खोचक सवाल

पुढच्या आठवड्यात आणखी ऑडिट करणार असून "आगे आगे देखो होता है क्या" असा सूचक इशारा भाजप नेते किरीट सोमैया यांनी शिवसेनेला दिला आहे. 

Updated: Feb 18, 2022, 05:15 PM IST
पोपट कुठे उडाला? सोमय्या यांचा खोचक सवाल title=

अलिबाग : काल परवापर्यंत कोर्लई गावात रश्मी ठाकरे यांच्या नावावर असणारे १९ बंगले गेले कुठे. हा पोपट नेमका कसा आणि कुठे उडाला याची चौकशी करावी. तसेच, पुढच्या आठवड्यात आणखी ऑडिट करणार असून "आगे आगे देखो होता है क्या" असा सूचक इशारा भाजप नेते किरीट सोमैया यांनी शिवसेनेला दिला आहे. 

किरीट सोमैया यांनी सकाळी कोर्लई गावाला भेट दिल, त्यानंतर त्यांनी रेवदंडा पोलीस ठाणे गाठून तेथे तक्रार दाखल केली. येथून त्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळला. सोमैया यांनी जिल्हाधिकारे यांची भेट घेतलयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली.   

१९ बंगल्याचे रहस्य काय?   
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे ५ कोटी १८ लाखांचे एकूण १९ बंगले येथे होते. हे बंगले चार दिवसात कसे गायब झाले. हे बंगले गायब करण्याचे अधिकार कुणी दिले. कोणत्या कायद्यानुसार हे बंगले हटविले गेले याची चौकशी करा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले. 

गोमूत्र शिंपडले चांगले आहे.
किरीट सोमैया यांनी कोर्लई ग्रामपंचायत कार्यालयात भेट दिली. त्यानंतर येथील ग्रामस्थांनी येथे गोमूत्र शिंपडून हे कार्यालय स्वतःच केले. त्यावर प्रतिक्रिरा देताना ते म्हणाले. रश्मी ठाकरे यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांवर ही वेळ आली. त्यावर मी फक्त दिलगिरी व्यक्त करू शकतो. 

संजय राऊत म्हणजे करमणुकीचा शो
सोमैया यांच्याविरोधात पवई येथे तक्रार दाखल झालाय आहे. यावर बोलताना ते म्हणाले, मी २११ घोटाळे केले. १५ कोटी एडिमार्फत दिले, असे रोज निराळे आरोप होत आहे. पण, घोटाळे केल्याचे एक कागद तरी दाखव. कागद काही नाही आणि नुसतेच आरोप करताहेत. आमही दाखवतो तसे पुराव्याचे कागद दाखवा आणि मगच आरोप करा असे आव्हान त्यांनी संजय राऊत यांना दिले. रोज सकाळी महाराष्ट्राला एक करमणुकीचा खेळ पाहायला मिळतोय असा टोलाही त्यांनी लगावला.