'पहिल्या पतीने केलं शारिरीक शोषण तर दुसऱ्याने...' अभिनेत्री स्नेहा वाघच मोठं वक्तव्य

स्नेहाने इंटिरियर डिझायनर अनुराग सोलंकीसोबत दुसरं लग्न केलं जे फक्त 8 महिने टिकलं. 

Updated: Nov 9, 2022, 11:24 PM IST
'पहिल्या पतीने केलं शारिरीक शोषण तर दुसऱ्याने...' अभिनेत्री स्नेहा वाघच मोठं वक्तव्य title=

मुंबई : सध्या सर्वत्र मराठी बिग बॉसची चर्चा रंगली आहे. अनेक चेहरे  बिग बॉसच्या माध्यमातून आता समोर आले आहेत. त्यामधील एक म्हणजे अभिनेत्री स्नेहा वाघ. बिग बॉसमुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री स्नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. यावेळीही अभिनेत्री तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने अनेकदा तिच्या तुटलेल्या  दोन लग्नाबद्दल सांगितलं आहे.  वयाच्या 19 व्या वर्षी तिने अविष्कार दार्वेकरसोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न जास्त दिवस टिकू शकलं नाही. 

कधी कधी अशी दोन माणसे भेटतात ज्यांना एकत्र राहणं कठीण जातं. अशा परिस्थितीत त्यांनी एकमेकांपासून वेगळं होणंच चांगलं असतं. अशीच कहाणी आहे 'ज्योती' आणि 'वीरा' सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री स्नेहा वाघची. स्नेहाने दोनदा लग्न केलं पण तिचं लग्न दोन्ही वेळा अयशस्वी ठरलं. पहिल्या पतीने तिचा शारीरिक छळ केला तर दुसऱ्याने तिला टॉर्चर केलं.

2018 मध्ये, स्नेहाने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिचं पहिले लग्न तुटल्याबद्दल सांगितलं होतं आणि आता तिने तिच्या दुस-या लग्नाबद्दलही सांगितलं आहे. स्नेहाने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी अविष्कार दारव्हेकरशी लग्न केलं. या लग्नात तिला कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडावं लागलं.

पहिल्या लग्नाच्या ब्रेकअपवर ती म्हणाली, "मी असं म्हणणार नाही की, तो चुकीचा माणूस होता, पण हो, तो माझ्यासाठी योग्य माणूस नव्हता. दोन अयशस्वी विवाहानंतर मला समजलं की पुरुषांना स्त्रिया आवडत नाहीत. आपल्या समाजात असं म्हटलं जातं की, केवळ पुरुषच कुटुंबाची काळजी घेऊ शकतात, मात्र हे खोटं आहे. मला माहित आहे की, मी माझं कुटुंब चालवण्यास सक्षम आहे."

स्नेहाने इंटिरियर डिझायनर अनुराग सोलंकीसोबत दुसरं लग्न केलं जे फक्त 8 महिने टिकलं. दोघंही बराच काळ एकमेकांपासून वेगळे राहत आहेत पण कायदेशीररित्या वेगळे झालेले नाहीत. पण लवकरच त्यांचा घटस्फोट होणार आहे. ती म्हणाली की, ''माझ्या पहिल्या लग्नाच्या वेळी मी खूप लहान होतो.

7 वर्षांनंतर मी दुसरं लग्न केलं पण मी पुन्हा चुकीच्या माणसाची निवड केली हे माझं दुर्दैव होतं." पण आता दोन लग्नं मोडून ती म्हणाली की आयुष्यात "प्रेम नाही, लग्न नाही.. मी आता कशालाही तयार नाही.''

स्नेहाने वयाच्या 17 व्या वर्षी मराठी थिएटरमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली, त्यानंतर ती 'अधुरी एक कहाणी', ज्योती आणि 'वीरा' सारख्या मालिकांमध्ये दिसली.