'माझी आई झाल्याबद्दल थँक्यू...'; जिनिलिया देशमुखची सासूबाईंसाठी खास पोस्ट, सासू-सुनेचं नातं घट्ट करण्यासाठी 5 टिप्स

Genelia Deshmukh Emotional Post : अभिनेत्री जिनिलिया देशमुखची सासूबाईंसाठीची पोस्ट चर्चेत. सासू-सुनेचं नातं घट्ट करण्यासाठी या टिप्स ठरतील फायदेशीर. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 11, 2023, 01:48 PM IST
'माझी आई झाल्याबद्दल थँक्यू...'; जिनिलिया देशमुखची सासूबाईंसाठी खास पोस्ट, सासू-सुनेचं नातं घट्ट करण्यासाठी 5 टिप्स title=

Genelia Deshmukh Relationship with Mother In Law : अभिनेत्री जीनिलिया देशमुख कायमच आपल्या सोशल पोस्टमुळे चर्चेत असते. जिनिलियाची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये जिनिलियाने आपल्या सासुबाई वैशाली विलासराव देशमुख यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये जिनिलियाने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 

जिनिलिया आणि रितेश देशमुख कायमच आपल्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. यावेळी जिनिलियाने सासू यांच्यासाठी शेअर केलेली पोस्ट त्यांच्या नात्यातील गुपित उलघडतं आहे. प्रत्येक सुनेने आपल्या सासूसोबतच नात कसं घट्ट करावं हे यामधून शिकण्यासारखं आहे. 

जिनिलायाची पोस्ट 

जिनिलियाने सासूबाई वैशाली देशमुख यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 'प्रेमळ आई... एक प्रगतीशील महिला कशी असते हे दाखविल्याबद्दल थँक्यू.. मी तुझीच असल्यासारखं प्रेम केल्याबद्दल थँक्यू... दररोज माझं मराठी सुधारल्याबद्दल थँक्यू आणि माझी आई झाल्यामुळे मनापासून आभार... तुझ्याकडे जी प्रतिभा आहे..तशी कुणाकडेच नाही. ' दरवर्षी जिनिलिया शेअर करते खास पोस्ट.. 
आपल्या भावना व्यक्त केल्यामुळे सासू-सुनेचं नातं होतं अधिक घट्ट. 

जिनिलियाने सासूबाईंना दिल्या शुभेच्छा 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

भावना व्यक्त करा

सासू-सुनेचं नातं हे कायमच तिघट-गोड असल्याचं सांगण्यात येतं. पण जिनिलियाने या नात्यातील गोडवा दाखवून दिला आहे. अनेकदा भावना व्यक्त केल्यामुळे मनातील समज-गैरसमज दूर होतात. नातं घट्ट करण्यासाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची ठरते. 

एकमेकांना समजून घ्या 

अनेकदा सासू-सुना आपण एक स्त्री आहोत, हे विसरून जातात. पण एकमेकींचा एक बाई म्हणून सन्मान करणे अत्यंत गरजेचे आहे. नातं अधिक घट्ट करण्यासाठी ही भावना अत्यंत महत्त्वाची ठरते. 

एकमेकींकडून नवीन गोष्टी शिका 

सासू-सून यामध्ये जनरेशन गॅप असते. अशावेळी एकमेकांच्या मैत्रिणी होण्याचा प्रयत्न करा. जिनिलिया अनेकदा तिच्या पोस्टमधून ही गोष्ट शिकवते. या पोस्टमध्ये जिनिलिया मराठी सासूबाईंकडून शिकल्याचं सांगते. असं जाहिर कौतुक केल्यास तुमचं नातं अधिक घट्ट होईल. 

आदर करा 

नात्यामध्ये प्रेम, आपुलकी, आदर आणि सन्मान या सगळ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सासू-सुनेच्या नात्यात या गोष्टी तर अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण यामुळे तुमचं नातं घट्ट होईलच पण यापेक्षा तुम्ही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी व्हाल. आई आणि लेकीचं नातं निर्माण होत नसेल तरीही चालेल पण मैत्रिणीचं नात निर्माण व्हायलाच हवं.