Chaitra Navratri: गुरुवारी घटस्थापनेसह नवरात्रीच्या पवित्र सणाला सुरुवात होईल. नऊ दिवस चालणाऱ्या या सणामध्ये अनेक भक्त कडक उपवास ठेवतात. तर काही लोक एक वेळेचं जेवून उपवास करतात. सणाच्या सुरुवातीला काही तरी गोड असलायचा हवं. या शिवाय देवी मातेला तुम्ही खीर नैवद्य म्हणूनही देऊ शकता. तुम्ही साबुदाण्याची खीर बनवून नऊ दिवसाच्या सणाची सुरुवात करू शकतात. आज आम्ही तुम्हाला साबुदाण्याची खीर कशी बनवायची हे सांगणार आहोत. चला साबुदाणा खीर बनवायची सोपी रेसिपी जाणून घेऊयात.
साबुदाणा - १/२ वाटी
दूध - १/२ लिटर
साखर - १/२ कप
वेलची पावडर - १ टीस्पून
काजू - १०
बदाम - १०
पिस्ता - १०
कंडेस्ड दूध - 2 चमचे
केशर - १ चिमूटभर
हे ही वाचा: कशापासून बनवला जातो उपवासात खाल्ला जाणारा साबुदाणा? जाणून घ्या फायदे
>सर्वप्रथम साबुदाणा नीट धुवून घ्या आणि थोडा वेळ पाण्यात भिजवा.
> यानंतर एका भांड्यात दूध काढून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. दूध उकळायला लागल्यावर त्यात थोडं पाणी टाका आणि पुन्हा उकळून घ्या.
> याच दरम्यान, काजू, बदाम आणि पिस्ता बारीक चिरून घ्या.
> दुधाला दुस-यांदा उकळी आल्यावर त्यात चिरलेला ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर टाकून 7-8 मिनिटे छान शिजवून घ्या.
> यानंतर भिजवलेला साबुदाणा दुधात घालून मंद आचेवर शिजू द्या.
> काही वेळाने मिश्रण उकळायला लागल्यावर त्यात कंडेन्स्ड मिल्क टाका आणि चांगले ढवळून घ्या.
> आता खीर साबुदाणा चांगला फुगेपर्यंत उकळवावा.
> उकळताना खीरमध्ये चवीनुसार साखर घालून मिक्स करा.
> आणखी ४-५ मिनिटे खीर शिजल्यानंतर त्यात केशर घालून विरघळवून गॅस बंद करा.
> ही साबुदाण्याची खीर गरम खा किंवा खीर काही वेळ फ्रिजमध्ये ठेवून थंड करून खा.
ENG
(1 ov) 2/0 (112.3 ov) 387
|
VS |
IND
387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(14.5 ov) 72
|
VS |
BRN
76/0(6.5 ov)
|
Bahrain beat Malawi by 10 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.