फक्त पालकच नाही तर मुलांनी देखील कराव्यात 5 खास गोष्टी, जया किशोरी यांचा भारतीय तरुणांना खास सल्ला

Jaya Kishori Parenting Tips : मुलांच्या संगोपनात अनेकदा पालकांनाच सल्ला दिला जातो. पण मोटिव्हेशनल स्पिकर जया किशोरी यांनी यावेळी तरुण मुलांना सल्ला दिला आहे. भारतीय मुलांनी या गोष्टी ठरवून कराव्यात. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 31, 2024, 10:58 AM IST
फक्त पालकच नाही तर मुलांनी देखील कराव्यात 5 खास गोष्टी, जया किशोरी यांचा भारतीय तरुणांना खास सल्ला title=

आई-वडिलांच्या जीवनात मुलांना अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण पालकांच संपूर्ण आयुष्य मुलांच्या अवती-भवती फिरत असतं. पण तसंच मुलांच्या जीवनातही पालकांना खूप महत्त्व असतं. मुलांच्या जडण-घडणीतही पालक महत्त्वाचे असतात. याची जाणीव म्हणून मुलांनी काही गोष्टी पालकांसाठी ठरवून केल्या पाहिजेत. मोटिव्हेशन स्पीकर जया किशोरी यांनी एका मुलाखतीत भारतीय मुलांना सल्ला दिला आहे. 

पालकांना कायम मुलांकडून एकच गोष्ट हवी असते ती म्हणजे त्यांचा सन्मान करणे. पण मुलं मोठी झाल्यावर, स्वतःच काम स्वतः करायला लागल्यावर पालकांचा आदर करणे विसरतात. अशावेळी जया किशोरी यांनी सांगितलेल्या 5 सल्लांचा विचार करावा. 

मुलांनी पालकांसाठी करावी ही गोष्ट 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mithi baten (@mithi_baten_)

वेळ घालवा 
सगळ्यात पहिलं मुलांनी पालकांसोबत वेळ घालवावा. मुलं अनेकदा ही गोष्ट करणं टाळतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनात मुलांनी पालकांना क्वालिटी टाइम द्यावा. कारण पालकांसाठी हीच गोष्ट ठरते महत्त्वाची. 

पिकनिक प्लान करा 
कुटुंबासोबत वेळ घालवा. यासाठी पिकनिकचा प्लान करु शकता. पालकांच्या आवडीच्या ठिकाणांना मुलांनी भेट द्यावी. पालकांच्या भावना ज्या ठिकाणांशी जोडल्या गेल्या आहेत. जसे की, त्यांचे बालपण, आवडीची ठिकाणे, हनिमून प्लेस अशा ठिकाणांचा विचार करा. 

फॅमिली स्पा 
कुटुंबासोबत आरामाचा आनंद घेण्यासाठी फॅमिली स्पामध्येही जाऊ शकता. यामुळे तुमच्या पालकांचा ताण कमी होईल आणि त्यांना आराम वाटेल. यामुळे त्यांना मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खूप हलके वाटेल. आपल्या पालकांना विशेष वाटण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.

कामात मदत करा 
जर तुम्हाला तुमच्या पालकांना खूश करायचे असेल तर त्यांच्या कामाचे आणि जबाबदाऱ्यांचे ओझे कमी करा. तुम्ही तुमच्या आईसाठी खास जेवण बनवू शकता किंवा वडिलांना स्कूटर- कार भेट देऊ शकता. यामुळे त्यांना अतिशय आनंद होईल. 

जुन्या आठवणींना उजाळा 
तुम्ही तुमच्या पालकांसोबत बसून भूतकाळातील काही चांगल्या आठवणी लक्षात ठेवू शकता. प्रत्येक कुटुंबात काही चांगल्या आठवणी आणि चांगल्या वेळ असतात ज्या आपण कधीही विसरत नाही. तुम्ही तुमच्या पालकांसोबत बसा आणि ते सोनेरी क्षण आठवा. यामुळे तुमचे कौटुंबिक बंध दृढ होतील. कुटुंबासोबत वेळ व्यतीत केल्याने तुम्हाला आनंदही वाटेल.