Twins Indian Baby Girl Names And Meaning : मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव आहे. कधी फॅशन स्टेटमेंट तर कधी लेकींच्या गमतीजमती क्रांती सोशल मीडियावर शेअर करत असते. क्रांतीने पहिल्यांदाच लेकींची झलक दिसेल असेल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गोदो आणि छबील अशी टोपण नावे कायम क्रांती सोशल मीडियावर घेत असते. पण या दोघींची खरी नावे फारच कमी लोकांना माहित आहे.
क्रांती रेडकरने पती एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी 'खुपते तिथे गुपते' या कार्यक्रमात लेकींच्या नावामागची गोष्ट देखील शेअर केली आहे. मुलांना आपणं नावे देतो तेव्हा त्यामागे असंख्य विचार असतात. समीर आणि क्रांतीने लेकींना दिलेल्या नावामागे काय आहे किस्सा, जाणून घ्या
क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांनी जुळ्या लेकींना 'झिया' आणि 'जायदा' अशी नावे दिली आहे. या दोन्ही नावांचे अर्थ अतिशय खास आहेत.
समीर वानखेडे यांनी काही दिवसांपूर्वी अवधुत गुप्तेच्या 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी लेकीच्या नावामागची गोष्ट सांगितली आहे. . 'झायदा' नाव हे समीर यांच्या आईच्या नावावरून ठेवलंय. त्यांच्या आईचं नाव 'झायदा' होतं. तर, 'झिया'चं नाव समीर यांच्या आत्याच्या नावावरून ठेवलंय. समीर म्हणाले, 'आत्याला कॅन्सर झाला होता आणि माझं आत्यावर खूप प्रेम होतं, त्यामुळे तिच्या नावावरून मुलीचं नाव ठेवलं.'
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
BRN
(20 ov) 187/5
|
VS |
QAT
191/5(20 ov)
|
| Bahrain beat Qatar by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 175/7
|
VS |
NZ
178/3(17.1 ov)
|
| South Africa beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
(20 ov) 175/7
|
VS |
SA
178/3(17.1 ov)
|
| South Africa beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.