Long Distance रिलेशनशिपमध्ये कधीच करु नका 'या' 4 चुका, प्रेम कायमचं संपेल

Long Distance Relationship: असे अनेक कपल्स आहेत जे आजही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहतात. पण ते त्यांच नातं बराच काळ टिकवू शकत नाहीत. अशावेळी नेमकं आपलं कुठे चुकतंय हे समजून घेणं गरजेचं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 15, 2024, 05:56 PM IST
Long Distance रिलेशनशिपमध्ये कधीच करु नका 'या' 4 चुका, प्रेम कायमचं संपेल  title=

Relationship Tips : लाँग डिस्टन्स रिलेशनशिप हे असे नाते असते ज्यामध्ये कपल्स एकमेकांपासून वेगळे राहतात. कधी शहरांमध्ये अंतर असते तर कधी दोघे वेगवेगळ्या देशात राहतात. अशा परिस्थितीत हे जोडपे कित्येक आठवडे किंवा महिने एकमेकांना भेटू शकत नाहीत. फोन किंवा व्हिडीओ कॉलवरचा संवादही कमी होतो. लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये समस्या किंवा गैरसमज निर्माण व्हायला वेळ लागत नाही कारण दोघेही एकमेकांसोबत असतात पण एकमेकांच्या जवळ नसतात. अशा परिस्थितीत, संवाद पूर्णपणे फोनवर अवलंबून असतो आणि कधीकधी त्या भावना फोनवर व्यक्त करणे कठीण होते. त्याचबरोबर नात्यात प्रेम असूनही ती भावना टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत तुम्हीही Long Distance रिलेशनशिपमध्ये आहात आणि तुमच्या नात्यातही कटुता निर्माण होत असेल तर खालील मुद्द्यांचा नक्की विचार करा. 

एकमेकांच्या वेळेनुसार नियोजन करा

जर तुमच्या दोघांचे वेळापत्रक एकमेकांपेक्षा खूप वेगळे असेल तर तुम्ही एकमेकांसाठी वेळ काढू शकणार नाही. अशा परिस्थितीत जेव्हा आधीच तुम्ही एकमेकांपासून लांब आहात आणि त्यामध्येही तुम्हाला बोलायलाही वेळ नसतो तेव्हा नात्यात एकमेकांची उणीव भासू लागते. त्यामुळे मन उदास होते आणि आपसात वादही होऊ लागतात.

लांब असल्याचा सतत उल्लेख नको

Long Distance रिलेशनशिपमध्ये एकमेकांना बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे भविष्याची आशा. भविष्यात लग्न होईल, त्यांना एकत्र प्रवास करावा लागेल, एकत्र आयुष्य घालवावे लागेल, या सर्व गोष्टी जोडीदारांना आशा देतात. परंतु, अनेकदा लग्न होऊनही हा दुरावा कमी होत नाही अशावेळी मन नाराज होते.  अशावेळी या दूर राहण्यावर चर्चा अजिबात करु नका. 

एकमेकांपासून गोष्टी लपवू नका

नातेसंबंध लांबचे असो वा नसो, एकमेकांपासून गोष्टी लपवल्याने समस्या निर्माण होतात. लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये, एकमेकांबद्दल शक्य तितके एकमेकांना सगळे सांगण्याचा विशेष प्रयत्न केला पाहिजे. एकमेकांचा दिवस कसा गेला, आयुष्यात काय चालले आहे. पण, जेव्हा एखादी गोष्ट जाणूनबुजून लपवली जाते, तेव्हा नात्यातील विश्वास कमी होतो. नात्यात काहीतरी नवीन घडण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, नात्यात ते प्रेम टिकून राहण्यासाठी आणि एकमेकांवरील प्रेम तसेच राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जेव्हा प्रयत्न केले जात नाहीत किंवा एकमेकांना आनंदी ठेवण्याचे प्रयत्न कमी होऊ लागतात, तेव्हा नात्यात दरारा दिसू लागतो. अशा स्थितीत नाते एक महिन्याचे असो, एक वर्षाचे असो किंवा 10 वर्षांचे असो, प्रयत्नांची कमतरता नसावी.