Droupadi Murmu Struggle: आधी 3-3 मुलं मग नवऱ्यालाही गमावलं, डिप्रेशनमधून कशा बाहेर पडल्या राष्ट्रपती

Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांनी घेतलेल्या मुलाखतीत एक वेगळी बाजू समोर आली आहे. जवळच्या तीन व्यक्तींना गमावल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी नैराश्यावर कशी केली मात. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 21, 2024, 04:43 PM IST
Droupadi Murmu Struggle: आधी 3-3 मुलं मग नवऱ्यालाही गमावलं, डिप्रेशनमधून कशा बाहेर पडल्या राष्ट्रपती title=

केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची नुकतीच एक मुलाखत घेतली. या मुलाखतीचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या मुलाखतीत सामान्य आदिवासी महिला ते बाल विकास मंत्री पर्यंतचा द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास कसा होता ते सांगितलं आहे. यांच्या यशामागे संघर्षाची कहाणी आहे. इथपर्यंतच्या प्रवासात द्रौपदी मुर्मू यांनी आपले पती आणि तीन मुलांना गमावलं आहे. कोणत्याही व्यक्तीसाठी हा प्रवास नक्कीच खडतर असताल. जवळपास 6 महिन्यांहून अधिक काळ डिप्रेशन, नैराश्य आणि नकारात्मकतेत अडकलेल्या द्रौपदी मुर्मू यांनी कशी मात केली? 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कथा ही खूप संघर्षाची कथा आहे आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या संघर्षामधन लोकांना प्रेरणा देऊ शकते. इतक्या कठिण काळावर द्रौपदी मुर्मू यांनी मात करुन आज त्या राष्ट्रपती या देशाच्या अतिशय महत्त्वाच्या पदावर आहेत. 

द्रौपदी मुर्मू यांच्या मुलाखतीतील महत्त्वाचा भाग 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial)

जवळच्यांना गमावलं 

द्रौपदी मुर्मू यांचे पहिले अवघ्या तीन वर्षांचे अपत्य 1984 मध्ये मरण पावले. 2010 मध्ये त्यांनी त्यांचा 25 वर्षांचा मोठा मुलगा लक्ष्मण गमावला. लहान मुलगा शिपून 2013 मध्ये जो 28 वर्षांचा होता तेव्हा त्याचेही निधन झाले. ऑक्टोबर 2014 मध्ये पती श्याम चरण यांनी मुर्मू आणि जगाचा कायमचा निरोप घेतला. चार वर्षांत दोन मुलगे आणि पतीच्या मृत्यूचा धक्का मुर्मूला सहन करावा लागला. आपल्या मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर मुर्मू सहा महिने डिप्रेशनमध्ये गेल्याचे सांगितले जाते. स्वतःच्या धैर्याच्या बळावर द्रौपदी मुर्मू या नैराश्यातून बाहेर पडू शकल्या. यासाठी द्रौपदी मुर्मू यांनी अध्यात्माची मदत घेतली. मुर्मू ब्रह्मा कुमारी या अध्यात्मिक संस्थेत सामील झाल्या आणि आपल्या मेहनतीने आणि कौशल्याने प्रगती करत राहिल्या. 

दैनंदिन जीवनात अनुशासन महत्त्वाचं 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अतिशय शिस्तबद्ध जीवन जगतात. मुर्मू देखील पीएम मोदींप्रमाणे रोज ध्यान करतात. यासाठी त्या पहाटे तीन वाजता उठते आणि नंतर ध्यान करते. त्या रोज योगाही करते. त्यानंतरची वेळ त्यांच्या नाश्ता करण्याची असते. या दरम्यान वर्तमानपत्र वाचणे हा त्यांच्या आवडीचा छंद आहे. . महत्त्वाचं म्हणजे द्रौपदी मुर्मू शुद्ध शाकाहारी आहेत. त्यांच्या जेवणात कांदा आणि लसूणही नसतो. 

योगा किती महत्त्वाचा

 योगासने आणि आसनांमुळे मेंदूतील सेरोटोनिनची पातळी नैसर्गिकरित्या वाढते. सेरोटोनिन एक न्यूरोट्रांसमीटर आहे ज्यामुळे आपल्याला चांगले वाटते. योगासने आपला मूड वाढवण्यासाठी रक्त पंप करतात. हे ध्यान आणि श्वासोच्छवासाच्या तंत्राद्वारे विश्रांतीची स्थिती आणून शांत करते. यामुळे चिंता कमी करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. अशी शेकडो योगासने आहेत जी चिंता आणि नैराश्याचा सामना करण्यास मदत करू शकतात. काही आसनांचा सराव करणेही सोपे आहे.