Hotel आणि Motel मध्ये काय फरक असतो? 90% टक्के लोकांना माहित नसेल उत्तर

Hotel आणि Motel हे दोन्ही लोकांना राहण्याची सुविधा देतात. मात्र दोघांच्या सुविधांमध्ये फरक असतो. तेव्हा हॉटेल्स आणि मॉटेल्समध्ये नेमका काय फरक असतो याविषयी जाणून घेऊयात. 

Updated: Aug 26, 2024, 07:14 PM IST
Hotel आणि Motel मध्ये काय फरक असतो? 90% टक्के लोकांना माहित नसेल उत्तर  title=
(Photo Credit : Social Media)

Difference Between Hotel and Motel: जेव्हा कधी तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करता, तेव्हा डोक्यात अनेक प्रश्न निर्माण होतात. फिरायला कुठे जायचे? तिथे जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था कशी असेल? इत्यादी. तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाणार असाल तेथे जर तुमच्या राहण्याची व्यवस्था चांगली असेल तर तुमचा प्रवास अगदी मजेशीर होतो. तुम्हाला हॉटेलबद्दल माहितीच असेल पण तुम्ही जेव्हा हायवेवरून प्रवास करता तेव्हा तुम्हाला अनेक ठिकाणी मॉटेल देखील दिसतात. Hotel आणि Motel हे दोन्ही लोकांना राहण्याची सुविधा देतात. मात्र दोघांच्या सुविधांमध्ये फरक असतो. तेव्हा हॉटेल्स आणि मॉटेल्समध्ये नेमका काय फरक असतो याविषयी जाणून घेऊयात. 

स्थळ  :

हॉटेल्स अधिकतर शहर, पर्यटन स्थळ आणि बिझनेस सेंटर्सच्यामध्ये स्थित असतात. जर तुम्हाला कोणत्या शहरात फिरायचे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हॉटेल्स मिळतील मोटेल्स मिळणार नाहीत. हॉटेलच्या डिझाईन आणि आर्किटेक्चर तेथे राहणाऱ्या पर्यटकांना आरामदायी आणि विलासी अनुभव मिळेल याचा विचार करून बनवले असते. मात्र मॉटेल्स शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नसतात ते अधिकतर हायवे किंवा मुख्य रस्त्यांवर बांधलेले असतात. मॉटेल्समध्ये प्रवास करणाऱ्यांना रात्रभर राहण्याची सोय असते. मॉटेलला लॉज असे सुद्धा म्हणतात ती अशी जागा असते जिथे जास्त सोयी सुविधा नसतात फक्त प्रवासी एक किंवा दोन रात्र तिथे आराम करू शकतात अशी व्यवस्था तिथे असते. तसेच याठिकाणी वाहनांच्या पार्किंगची सुविधा सुद्धा तुम्हाला मिळू शकते.  

हेही वाचा : घरातील प्रेशर कुकर बनेल टाइम बॉम्ब, गॅसवर ठेवण्यापूर्वी चेक करा या 5 गोष्टी

फॅसिलिटी आणि सर्व्हिस :

हॉटेलमध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या आरामदायी आणि लग्झरी सुविधा मिळतात. तर मॉटेल्समध्ये तुम्हाला रात्र काढण्यासाठी काही गरजेच्याच सुविधा दिल्या जातात. हॉटेलमध्ये स्विमिंग पूल, जिम, स्पा, बिझनेस सेंटर, रेस्टोरंटस सारख्या सुविधा मॉटेल्समध्ये नसतात. तेथे फक्त साधारण खोल्या, बेड, मोफत पार्किंग आणि नाश्ता इत्यादींच्या सुविधा असू शकतात. 

राहण्याची वेळ :

हॉटेलमध्ये अनेकदा आपण हॉटेलमध्ये बराच वेळ राहू शकतो. जेव्हाही तुम्ही एखाद्या शहरात फिरायला जाता किंवा बिझनेस मीटिंगला जाता तेव्हा तुम्ही हॉटेल निवडता. मात्र जेव्हा तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करत असता तेव्हा तुम्ही राहण्यासाठी मॉटेल्स निवडू शकता. मॉटेल्समध्ये तुम्ही फक्त एक ते दोन रात्र राहू शकता. 

बजेट :

हॉटेल रूममध्ये तुम्हाला अनेक लग्झरी सुविधा मिळतात. त्यामुळे हॉटेलच्या रूमचं भाडं हे तुलनेनं मॉटेल्स पेक्षा जास्त असतं. मॉटेल्स हे बजेट फ्रेंडली असतात.